Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) दणक्यात आपटले. आता 2023 वर्ष उजाडलं आहे. नव्या वर्षात प्रेक्षकांना मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट चालतील की नाही हे आताच स्पष्ट होणार नाही, पण 2023 या वर्षात बॉलिवूडचा धमाका करण्याचा प्लान आहे, हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड चित्रपट करतोय स्ट्रगल
लॉकडाऊनपासून बॉलिवूड चित्रपट स्ट्रगल करताना दिसत आहेत. कोरोनाआधी (Corona) 300 कोटी कमवणारे हिंदी चित्रपट (Hindi Movie) आता लडखडताना दिसत आहेत. 2022 मध्ये सर्वाधित हिट ठरलेल्या ब्रम्हास्त्र (Brahmāstra) चित्रपटानेही 270 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. त्यामुळे नव्या वर्षात बॉलिवूडसमोर मोठी आव्हान आहेत. यावर्षात शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) सारख्या दिग्गजांपासून कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), वरुण धवन (Varun Dhavan) सारख्या यंग स्टारपर्यंत अनेक प्रोजेक्ट्स आहेत. या चित्रपटावर बॉलिवूडचे तब्बल 2500 कोटी लागले आहेत. 


1. पठाण
2023 या नव्या वर्षात सर्वाधिक उत्सुकता आहे ती शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणची (Deepika Padukone) प्रमुख भूमिका असलेला पठाण (Pathaan) चित्रपट. या चित्रपटात जॉन अब्राहम (John Abraham) खलनायक साकारतोय. या चित्रपटाली बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यावर आधीच मोठा वाद उभा राहिला आहे. येत्या 25 जानेवारीला पठाण प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बजेट 250 कोटींच्या जवळपास असल्याचं बोललं जात आहे.


 2. शहजादा 
रोहित धवन दिग्दर्शित शहजादा या चित्रपटात पहिल्यांदाच कार्तिक आर्यन अॅक्शन रुपात दिसणार आहे. 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्याया चित्रपटात कार्तिक बरोबर क्रिती सेनेन (Kriti Sanon) लीड रोलमध्ये आहे. आतापर्यंत मोजक्या चित्रपटात दिसणारा कार्तिक पहिल्यांदाच अॅक्शन-ड्रामा असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं बजेट 60 कोटी इतकं असल्याची माहिती आहे. 


3. मैदान 
फूटबॉल खेळावर आधारीत असलेला मैदान हा अभिनेता अजज देवगनचा (Ajay Devgan) चित्रपट आधीपासूनच पूर्ण झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही टळून गेली आहे. त्यानंतर आता हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटावर प्रोड्यूसर बोनी कपूर (Boney Kapoor) यांचे तब्बल 100 कोटी लागले आहेत. 


 4. भोला 
अजय देवगनची हा धमाकेदार अॅक्शन चित्रपट 30 मार्चला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा टीझर आणि अजय देवगनचा फर्स्ट लूक पाहून हा चित्रपट जोरदार हिट ठरणार असल्याचं बोललं जात आहे. तामिल चित्रपट कैथीवर आधारीत भोला (Bhola) या चित्रपटावर जवळपास 80 ते 100 रुपये खर्च करण्यात आले आहेत. 



5. बवाल 
दंगल आणि छिछोरे सारखे हिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बवाल या नव्या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 7 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून वरुण धनवच्या कारकिर्दीतील सर्वाधिक बटेज असणारा हा चित्रपट आहे. मिळालेल्या माहितीनुसार बवाल या चित्रपटाचं बजेट 100 ते 130 कोटी इतकं आहे. 


6. किसी का भाई किसी की जान 
2023 यावर्षात भाईजान अर्थात सलमान खान पुन्हा एकदा ईदच्या मुहूर्तावर धमाकेदार चित्रपट आणण्याच्या तयारीत आहे. 21 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सलमान खानबरोबर पूजा हेगडे, शहनाज गिल, जस्सी गिल, राणा डग्गुबाती, व्यंकटेश आणि राम चरण सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. सलमान खानच्या या चित्रपटावर 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 


7. रॉकी और रानी की प्रेम कहानी 
काही वर्षांच्या ब्रेकनंतर करण जोहर डायरेक्टर म्हणून परतला आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय धर्मेंद, शबाना आझमी आणि जया बच्चन हे ज्येष्ठ कलाकारही दिसणार आहेत. 28 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रटपटाचं बजेट 70 ते 90 कोटी रुपये इतकं आहे. 



8. जवान 
तामिळ चित्रपटसृष्टीतील डिरेटक्टर एटलीबरोबर शाहरुख खानचा जवान हा चित्रपटा येत्या 2 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा सारखे कलाकार असून तब्बल पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवान या चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. 


9. आदिपुरुष
प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनेन यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. नव्या वर्षाची सुरुवात या चित्रपटाच्या प्रदर्शनापासून होणार होती, पण टीझरवर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्याने प्रदर्शनाची तारीख टाळण्यात आली. या चित्रपटात काही बदल करुन प्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वर्षातला हा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 



 
10. सत्य प्रेम की कथा 
कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला सत्य प्रेम की कथा हा चित्रपटा म्युझिकल चित्रपट असल्याची माहिती आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी अभिनेत्री असून हा चित्रपट 29 जूला प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचं बजेट 50 ते 60 कोटी रुपये इतकं आहे. 


11. एनिमल 
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा एनिमल हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. कबीर सिंह बनवणारे संदी रेड्डी वांगा या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार या चित्रपटात रणबीर सिंग एका अशा रुपात दिसणार आहे, जो याआधी कधीच दिसला नव्हता. या चित्रपटाचा बजेट 120 कोटी इतका आहे. 


हे ही वाचा : Shocking Video : जिवंत कीडा खाणं तरुणाला पडलं महाग, बघा चेहऱ्याची काय अवस्था झाली


12. टाइगर 3 
ईदनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर दंबगाई दाखवण्यासाठी सलमान खान सज्ज आहे. 10 नोव्हेंबरला सलमान आपल्या टायगर 3 (Tiger 3) या चित्रपटासह झळकणार आहे. या चित्रपटात कतरीना कैफ (Katrina Kaif) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं बजेट साधारणत: 200 कोटी रुपये इतकं आहे. अॅक्शन, ड्रामा, रोमान्सचा मसाला या चित्रपटात भरण्यात आला आहे. 


13. बड़े मियां छोटे मियां 
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ज्या चित्रपटात आहेत, अर्थात तो चित्रपट अॅक्शनने 
(Action Movie) भरलेला असणार हे आलंच. बड़े मियां छोटे मियां या चित्रपटाचं बजेटही तितकंट तगडं आहे. या चित्रपटावर 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाची तारीख 22 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. पण शाहरुखचा चित्रपट याच तारखेला प्रदर्शित झाल्यास बड़े मियां छोटे मियां चित्रपटाची तारीख टळू शकते.


14. डंकी 
2023 मध्ये शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणण्याच्याच इराद्याने उतरणार आहे. पठाण आणि जवाननंतर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या डंकी (Dunki) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सोशल कॉमेडीव थीमवर आधारीत असून 22 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं बजेट 100 कोटी रुपये इतकं आहे. 


15. गणपत, मिशन ईगल, स्क्रू ढीला
या वर्षात टायगर श्रॉफ मोठा धमाका करायला सज्ज झाला आहे. दोन मोठे अॅक्शन चित्रपट घेऊन तो येतोय. यातला पहिला चित्रपट आहे गणपत. विकास बहल यांच्या या चित्रपटाचं शुटिंग जवळपास पूर्ण होत आलं असून 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय टायगरचा मिशन ईगन हा चित्रपटही प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात टायगरबरोबर सारा अली खान दिसणार आहे. तसंच काही दिवसांपूर्वी करण जोहरने टायगर श्रॉफला घेऊन अॅक्शन चित्रपट स्क्रू ढिला या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात टायगरबरोबच रश्मिका मंदाना दिसणार आहे. 


हे ही वाचा : चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video


16. कबीर खान-कार्तिक आर्यन फिल्म


2023 मध्ये कार्तिक आर्यन कबीर खान यांच्या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचं बजेटही जवळपास 60 ते 80 कोटीच्या जवळपास आहे. 


हे सर्व चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. 2022 मध्ये बॉलिवूडला लागलेलं ग्रहण या चित्रपटांमुळे सुटेल अशी आशा करुयात. हे चित्रपट हिट ठरले तर बॉलिवूडला नक्कीच चांगले दिवस येतील.