Entertainment : बॉलिवूडमधला प्रसिद्ध आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन (Hrithik Roshan). आपल्या लाजबाब अभिनयाबरोबरच डान्स आणि फिटनेसमुळेही ऋतिक रोशन लाखो चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतो. नुकताच ऋतिक रोशनने आपला 49 वा वाढदिवस साजरा केला (Hrithik Roshan Birth Day). लाखो चाहत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्याला वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक्स वाईफ सुजेन खानपासून (Sussanne Khan) गर्लफ्रेंड सबा अजादपर्यंत (Saba Azad) सर्वांनी ऋतिकबरोबरचे फोटो शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यात एक फोटो असा होता, ज्या फोटोने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतिकच्या त्या फोटोने खळबळ
ऋतिकच्या तो फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत ऋतिक रोशनबरोबर आणखी एक व्यक्ती दिसतोय. हा दुसरा तिसरा कोणी नाही तर ऋतिकची एक्स वाईफ सुजेन खानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणी  (Arslan Goni) आहे. ऋतिकच्या वाढदिवसानिमित्ताने अर्सलानने त्याच्याबरोबरच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्या फोटोची आता चांगलीच चर्चा होत आहे. (Sussanne Khan Boyfriend Arslan Goni)


बॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकतं
ऋतिक रोशनने अर्सलान गोणीबरोबर केवळ फोटोच काढला नाही, तर वाढदिवसानिमित्ताने त्याने सुजेन आणि अर्सलान गोणीबरोबर पार्टीही केली. अर्सलानने ऋतिकबरोबरच फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत ऋतिक रोशनने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून चेहऱ्यावर चित्रविचित्र भाव आणला आहेत. तर अर्सलानने व्हाईट टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे. (Hrithik Roshan Arslan Goni viral pic)



फोटोवर ऋतिक रोशनची प्रतिक्रिया
ऋतिक रोशनबरोबरच्या फोटोत अर्सलानने 'हॅप्पी, हॅप्पी बर्थ डे ऋतिक रोशन' असं म्हटलं आहे. तर ऋतिक रोशननेही फोटो रिशेअर करत थँक्स यारा असं म्हटलं आहे. हा फोटो पाहून यूजर्स हैराण झाले आहेत. आपल्या पहिल्या पत्नीच्या बॉयफ्रेंडबरोबर असं फोटोसेशन करणं युजर्सना फारसं रुचलेलं दिसत नाही. या फोटोवरुन युजर्सने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी ऋतिक रोशननेही अर्सलान गोणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.


लग्न आणि घटस्फोट
ऋतिक रोशन आणि सुजेन खान यांनी 2000 साली लग्न केलं. तर 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ऋतिक आणि सुजेनला ह्रिधान आणि ह्रेहान रोशन अली दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही ऋतिक आणि सुजेनमधलं नातं चांगलं आहे. दोघांची चांगली बॉण्डिंग असून अनेक वेळा मुलं आणि ते दोघं एकत्र दिसतात. घटस्फोटानंतर सुजेन अर्सलानला तर ऋत्रिक सबा आजादला डेट करतायत.