Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (bhool bhulaiyaa 2) हा चित्रपट लोकांच्या चांगलात पसंतीत उतरला. एकिकडे बॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपटत असताना 'भूल भुलैय्या 2' ने चांगलंच कलेक्शन केलं. अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कार्तिक आर्यनने साकारलेल्या रुह बाहाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कार्तिक आर्यनचा रुह बाबा नव्या अवतारात दिसणार आहे. रुह बाबाचं हे पात्र कॉमिक बूकच्या (Comic Book) माध्यमातून भेटीस येणार आहे. स्वत: कार्तिक आर्यनने ही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


कार्तिक आर्यनने चित्रपटात साकारलेलं रूह बाबाचं पात्र आता 'रूह बाबा की भूल भुलैया' या कॉमिकमध्ये वाचता येणार आहे. कॉमिक बुकचा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कार्तिकने लिहिलंय 'रूह बाबा आणि त्यांच्या कथा आता 'भूल भुलैया' कॉमिक्समध्ये आल्या आहेत. हे माझ्या सर्व छोट्या चाहत्यांसाठी आहे. कार्तिकच्या या पोस्टनंतर चाहते खूप उत्सुक आहेत.



डायमंड कॉमिक बूक्स 'रूह बाबा की भूल भुलैया' हे कॉमिक बूक छोट्या चाहत्यांसाठी घेऊन येतंय. डायमंड कॉमिक बूक्स हे प्रसिद्ध प्रकाशक आहेत. त्यांनी चाचा चौधरी आणि मोटू पतलू सारखी पात्रे दिली आहेत. कार्तिक आर्यन त्याच्या पिढीतला पहिला अभिनेता आहे, ज्याच्यावर अशाप्रकारचं कॉमिक बूक येणार आहे. त्यामुळे त्याच्या लहान चाहत्यांमध्ये या कॉमिक बूकबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.


कार्तिक आर्यन सध्या रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलु'चा रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर क्रिती सेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात तो कियारा अडवाणीबरोबर दिसणार आहे.