Alia Bhatt Yoga Video : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या स्टार कपलला 6 नोव्हेंबर रोजी गोड मुलगी झाली. काही दिवसांपूर्वी आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) पोस्ट करत आपल्या लेकीचं नाव जाहीर केलं. आलिया आणि रणबीरच्या लेकीचं नाव 'राहा' (Raha) आहे. राहाचा जन्म होऊन आता दीड महिना उलटून गेलाय. आलिया सध्या आपल्या फिटनेसवर (Fitness) लक्ष केंद्रीत करतेय. अशात आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिलिव्हरीनंतर फिटनेसवर लक्ष
राहच्या जन्मानंतर आलिया भट्ट आपल्या दैनंदिन कामात परत आलीय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर आलियाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत आलिया एरियल योगा (Aerial Yoga) करताना दिसत आहे. पण प्रसूतीनंतर अवघ्या दीड महिन्यातच आलिया इतका अवघड योगा करत असल्याचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. 


आलियाचा व्हिडिओसोबत खास संदेश
पोस्ट शेअर करत आलियाने एक मेसेजही लिहिला आहे. यात तीने म्हटलंय, प्रसूतीच्या दीड महिन्यानंतर हळू-हळू दैनंदिन कामांशी जोडली जात आहे. @anshukayog च्या मार्गदर्शनाखाली मी एरियल योगा केला. माझी सर्व मातांना विनंती आहे प्रसूतीनंतर सर्व मातांनी आपल्याला शरीराचं ऐकायला हवं. आपल्या शरीराल अशक्य होईल अशी कोणतीही गोष्ट करु नका' असं आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आलियाच्या ट्रेनरने सोशल मीडियावर आलियाचा योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या, असा सल्लाही आलियाने दिला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ANSHUKA YOGA (@anshukayoga)


मुलगी राहाविषयी आलियाबरोबर आपलं कसं बॉण्डिंग आहे याशिवाय रणबीर सिंग एका मुलाखतीत सांगितलं होतं. आलिया आपल्यापेक्षा जास्त काम करते, राहाच्या जन्मानंतर आलिया जेव्हा शुटिंगमध्ये असेल तेव्हा मी राहची काळजी घेईन आणि जेव्हा मी शुटिंगला असेन तेव्हा राहाबरोबर आलिया भट्ट असेल असं रणबीरने म्हटलं होतं. यावरुनच रणबीर आणि आलिया आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल साधताना दिसतायत.


'राहा'च्या नावाचा अर्थ काय?
मुलगी 'राहा'च्या नावाचा अर्थ आलियाने एक पोस्ट शेअर करत सांगितला होता. राहा म्हणजे एक दैवी मार्ग, स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, संस्कृतमध्ये याचा अर्थ गोत्र,  बंगालीमध्ये याचा अर्थ विश्रांती, अरबी भाषेत याचा अर्थ शांती, आनंद, स्वातंत्र्यट अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये आलियाने राहा नावाचा अर्थ सांगितला होता.