Bollywood Gossips in marathi :  बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आहे तर बॉलिवूडमधील तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री होती श्रीदेवी. पण बॉलिवूडमधील पहिली सुपरस्टार अभिनेत्री कोण होती तुम्हाला माहिती आहे का? या अभिनेत्रीमुळे अनेक दिग्गज अभिनेत्रींना घाम फुटायचा. अभिनयासोबतच तिच्या नृत्याने तिने बॉलीवूडसह चाहत्यांनाही आपलंस केलं होतं. अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य करणारी ही अभिनेत्री करिअरच्या शिखरावर असताना तिने बॉलीवूडला रामराम ठोकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये या अभिनेत्री आल्या आणि त्यांनी बॉलीवूडवर राज्य केलं. हेमा मालिनी, जयाप्रदा, श्रीदेवी, रेखा यांनी त्यांनी सौंदर्य आणि अभिनयाने बॉलीवूड गाजवलं. पण दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये या सगळ्यांच्या पहिली कुठली अभिनेत्री आली होती तिचं नाव तुम्हाला माहिती आहे का? त्या अभिनेत्रीला मधुबाला, नूतन, नर्गिस आणि मीना कुमारीही अवाक् व्हायच्या.  



अशी सापडली ही अभिनेत्री 


साधारण 1940 च्या दशकात AVM प्रॉडक्शनचे AV मयप्पा चेट्टियार आणि निर्माता-दिग्दर्शक एम.व्ही. रमण चेन्नईमध्ये भरतनाट्यम नृत्य पाहिला गेले होते. त्यावेळी 13 वर्षांच्या मुलीचं नृत्यू पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी या मुलीला त्यांचा 'वाजकाई' चित्रपटात घेतलं. या अभिनेत्रीने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही गदर माजवला. या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 1951 मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या वैजयंतीमाला...(Entertainment News actress vyjayanthimala first female superstar of indian cinema Bollywood Gossips in marathi)



डोळ्यांच्या जादूने चाहत्यांना केलं मंत्रमुग्ध 


त्यांचा अभिनय आणि डोळ्यांच्या जादूने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. 1961 मधील 'गंगा जमुना'मध्ये ग्रामीण मुलीची भूमिकाने त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर 1966 मधील'आम्रपाली'तील गणिकेची किंवा 1964 मध्ये 'संगम'मधील शहरी सोफिस्टिकेटची भूमिका पाहून ते चाहत्ये घायाळ झाले. त्यांची गाणंही खूप प्रसिद्ध होते आजही ती गाणं लागली की चाहत्ये ऐकतच राहतात. 'मन डोले मेरा तन डोले...', 'मैं का करूं राम मुझे बुढा मिल गया...', 'होथों पे ऐसी बात...' आणि 'उदे जब जब जुल्फीन' यातील त्यांचा अदा आणि नृत्याने तर आजही प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत शिवाय त्या बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार मानल्या जातात. 



पण त्यांचं लग्न राज कपूरचे फॅमिली डॉक्टर चमन बाली यांच्याशी झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर चमन बाली आधीच विवाहित होते आणि त्यांना तीन मुले आहेत. डॉ. चमन बाली यांचं 1986 मध्ये निधन झालं.



त्या कायम म्हणतात, 'जोपर्यंत ती नाचत राहील, तोपर्यंत ती जिवंत असेल'.  यानंतर त्या फक्त नृत्यासाठी जगतात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. 



आजही वैजयंतीमाला लाइमलाइटपासून दूर 


खरं तर वैजयंतीमाला या बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्मफेअर पुरस्कार नाकारला होता.



पण आजही त्या पण त्यांचं लग्न राज कपूरचे फॅमिली डॉक्टर चमन बाली यांच्याशी झालं. मात्र त्यांचा मुलगा सुचिंद्र बाली अभिनेता आहे.