सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन... तैमूरही झाला खूश
सैफ अली खान आणि करीना कपूरने सोशल मीडियावर फोटो केला शेअर
Entertainment News : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. सैफ अली खानने रँग्लर ही लक्झरी जीप (Jeep Wrangler) खरेदी केली आहे. काही महिन्यापूर्वी सैफ आणि करीनाने या गाडीची टेस्ट ड्राईव्ह (Test Drive) घेतली होती. त्याचवेळी त्यांनी ही जीप आवडली होती. आता 1 ऑक्टोबरला ही रँग्लर जीप त्यांच्या घरी दाखल झाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) सैफ आणि करीनाने शेअर या ब्लॅक ब्यूटीचा शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
लक्झरी जीप रँग्लर
रँग्लर जीप घरी आल्यानंतर सैफ अली खानने तैमूरसह या जीपमधून फेरफटका मारला. इतकंच नाही तर तैमूर याच जीपमधून शाळेतही गेला. सैफ आणि करीना या दोघांना स्पोर्ट्स कार्सचा (Sports Car) छंद आहे. रँग्लर जीप लाँच झाल्यानंतर ही जीप विकत घेण्याचं प्लॅनिंग सैफने केलं होतं. ही जीप लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायक तसंच रोजच्या वापरासाठी आरामदायी आहे. या जीपचे दोन व्हेरिएंट आहे, यातल्या एका व्हेरिेएंटची किंमत 57 लाख रुपये आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 63 लाख रुपये इतकी आहे. तर ऑन रोड किंमत 67 लाख रुपये इतकी आहे.
रँग्लर जीप स्मूथ ड्राईव्हसाठी ओळखली जाते. अगदी खराब रस्त्यावरूनही अगदी आरामदायी प्रवास या जीपमधून करता येतो, विशिष्ट हेतूनं बनवण्यात आलेलं एक वेगळं आणि सर्वोत्तम डिझाइन आहे. अर्थातच मूळची जीप ही संकल्पना तशीच ठेऊन त्यांनी या गाडीची बांधणी करण्यात आली आहे. याचवर्षी या रँग्लर रुबीकॉन लाँच करण्यात आली आहे.
सैफ आणि करिनाने जी रँग्लर जीप खरेदी केली आहे ती विलीस एडिशन कार आहे. याला रॉक रेल, 32-इंचाचे टायर्स आहेत. यात 3.0 लिटर डिझेल V6 इंजिन आहे जे 260 हॉर्सपॉवरचं आहे. जीप रँग्लर ही ऑफ-रोडिंगसाठी सर्वोत्तम कार मानली जाते. बॉलिवडूच्या या पॉवरफूल कपलकडे अनेक महागड्या कार आहेत. करीना कपूर मर्सडिजने प्रवास करते तर सैफ अली खान रेंज रोवर चालवणं पसंत करतो.