Rozlyn Khan New Photo : गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधल्या (Bollywood) अनेक कलकारांनी कॅन्सरसारख्या (Cancer) दुर्धर आजाराशी झुंज दिली. या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय. अभिनेत्री रोजलिन खानला (Rozlyn Khan) कॅन्सरने ग्रासलं आहे. 'आ भी जा...' या गाण्यात रोजलिनने रजनीस दुग्गलबरोबर शेवटचा अभिनय केला होता. त्यानतंर तीने आपल्यो सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media) एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्याला झालेल्या गंभीर आजाराची माहिती दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोजलिनचा नवा लूक
रोजलिनने आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने रोजलिनने हा व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान किमोथेरपीमुळे रोजलिनचे केस पूर्णपणे गळाले आहेत. याच लूकमध्ये तीने फोटोशूट (Photo Shoot) केलं असून यात ती खूप आत्मविश्वासाने पोज देताना दिसतेय.


चाहत्यांसाठी भावूक संदेश
व्हिडिओबरोबर रोजलिनने एक संदेशही लिहिला आहे. आपण सर्व केसविरहीत जन्माला येतो. केस ही आपल्या जगण्याची परिभाषा नाही. आपल्यात आत्मविश्वास असेल तर कोणताही लूक आपल्याला चांगलाच दिसतो. प्रत्येक स्त्रीने आत्मविश्वाने जगण्याचा आनंद घ्या. केमो थेरपी मला जीवनाचा आनंद घेण्यापासून रोखू शकत नाही, असं रोडलिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 



रुग्णालयातून शेअर केला होता फोटो
याआधी रोजलिनने कॅन्सर झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला फोटो शेअर केला होता. यासोबत तिने लिहिलं होतं, मी कॅन्सरशी लढा देत आहे. देव नेहमी सशक्त लोकांनाच कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची संधी देत असावा. सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे तो माझ्या आयुष्यातील एक धडा आहे. पण मी यातून बाहेर पडेन असा मला विश्वास आणि आशा आहे. असं रोजलिनने लिहिलं होतं.


कोण आहे रोजलिन खान?
रोजलिन खान ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे ती नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. याशिवाय तिने अनेक मालिका आणि, आयटम साँग आणि चित्रपटात काम केलं आहे. PETA साठी केलेल्या एका फोटशुटनंतर रोजलिन चर्चेत आली. 


सविता भाभी नावाने प्रसिद्ध
रोजलिनने अनेक चित्रपटात काम केलं असलं तरी 'सविता भाभी' चित्रपटानंतर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली. पुढे याच नावाने तिला ओळख मिळाली. रोजलिनने चित्रपटात अधिकतर हॉट भूमिका साकारल्या आहेत.