Entertainment : हिंदी बिग बॉसच्या 18 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या (Big Boss 18) घरात टीव्हीबरोबरच विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) बिग बॉसच्या घरातील सदस्य आहेत. पण यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे 19 वा स्पर्धेक म्हणून बिग बॉसमध्ये चक्क एका गाढवाला (Donkey) एन्ट्री देण्यात आली आहे. हा गधराज गुणरत् सदावर्ते यांचा पाळिव गाढव आहे. बिग बॉस हिंदी सुरु होऊन आता तीन दिवस झालेत. पण आता या गधराजमुळे बिग बॉसचे निर्माते अडचणीत येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गधराजमुळे बिग बॉस अडचणीत
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेट या संघटनेने बिग बॉसच्या निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. प्राणी कल्याण संस्था अर्था पेटाने कार्यक्रमात गधराजच्या समावेशावरुन नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात गाढव ठेवल्याबद्दल  बऱ्याच लोकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. लोकांच्या तक्रारी आहेत. ज्याकडे यापुढे दुर्लक्ष करता येणार नाही, असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. त्या गाढवाला संस्थेकडे सोपवण्यात यावं असं अपील पेटाने बीग बॉसचं सूत्र संचालन करणाऱ्या सलमानला केलं आहे.  प्राण्यांची चेष्टा करणं योग्य नाही तसंच प्राण्यांना 'मनोरंजनाची गोष्ट' मानू नये असं पेटाने म्हटलं आहे. 


बीग बॉसच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये 19 वा सदस्य म्हणून गाढवाची एन्ट्री करण्यात आली होती. बिग बॉसच्या घरात गाढवाला एका कोपऱ्यात बांधून ठेवण्यात आलं आहे. घरातील सदस्य गाढवाची काळजी घेताना दिसत आहे. पण गाढवाला या कार्यक्रमात कैद करुन ठेवण्यात आल्याचा आरोप पेटाने केला आहे. 


सदावर्ते यांचं पाळिव गाढव
बिग बॉसच्या घरातील हे गाढव वकिल गुणरत्न सदावर्ते यांचं पाळिव गाढव आहे. सदावर्ते यांची मुलगी झेन हीला प्राण्यांची आवड आहे. यामुळेच त्यांनी घरी गाढव पाळलं आहे. या गाढवाचे नाव मॅक्स आहे. पण बिगबॉसमध्ये या गाढवाचं गधराज असं नामकरण करण्यात आलं आहे. झेनच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून हे गाढव घेतलं होतं असे स्पष्टीकरण सदावर्ते यांनी दिलं होतं.