Esha Deol Bikini Scene : अभिनेत्री ईशा देओल ही दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी मुलगी आहे. ईशा देओलचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आपण पाहत असतो. अशात ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' चित्रपटातील तिच्या बिकिनी सीनविषयी बोलली आहे. या सीन शूट करण्याआधी ईशानं तिची आई हेमा मालिनीकडून परवानगी घेतली होती. याशिवाय ईशानं तिच्या या बिकिनी सीनविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा देओलनं 'बॉलिवूड बबल'ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ईशानं ती बिकिनी सीन शूट करण्याआधी घाबरल्याचे सांगितले. याविषयी सांगताना ईशा म्हणाली की तिच्या आईनं तिला सांगितलं की पूर्ण लक्ष देऊन हा सीन शूट कर आणि हा सीन परफेक्ट असला पाहिजे. तर तिला या सीनसाठी आदित्य चोप्रानं चक्क 6 महिन्यांचा वेळ दिला होता. त्याविषयी ईशानं सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. आईनं मला सुट्ट्यांमध्ये आणि पोहताना बिकिनीमध्ये पाहिलं होतं. पण मला चित्रपटात बिकिनी परिधान करण्याविषयी विचारताना मला तिची फार भीती वाटत होती. ईशा आईला इकती घाबरत होती की, तिची प्रतिक्रिया काय असेल या विचारानंही तिला घाम फुटला होता. परिस्थिती आणि प्रसंग वेगळे घेतले तर आपल्यापैकी अनेकांच्याच मनात आई म्हटलं की तिची शिस्त आणि वेळीच मिळणारा ओरडाही आठवतो.



ईशा या विषयी बोलताना म्हणाली की 'आदित्यनं मला सांगितलं की तो एक चित्रपट करतोय. या चित्रपटात तुझा एक वेगळा लूक पाहायला मिळेल. फक्त वेगळा नाही तर खूप वेगळा अवतार पाहायला मिळेल. तुला बिकिनी परिधान करावी लागेल. त्यामुळे तू आतापासून तयारी सुरु कर. त्यावर मी लगेच म्हणाले की मला एक दिवसाचा वेळ पाहिजे. मी माझ्या आईची आधी परवानगी घेते. त्यानंतर मी घरी आले आणि आईला विचारले. आईला विचारत असताना मी खूप घाबरले होते. हिंम्मत करत आई हेमा मालिनीला या विषयी विचारलं.' ईशानं हेमा मालिनी यांना विचारलं की मला बिकिनी घालावी लागेल, तर काय करू? त्यावर उत्तर देत हेमा मालिनी म्हणाल्या,' यात विचारण्यासारखं काय आहे. नक्कीच बिकिनी परिधान कर. तू जेव्हा मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जातेस तेव्हा बिकिनी परिधान करतेस ना. मग चित्रपटात का नाही. पण हा सीन खूप चांगल्या प्रकारे शूट झाला पाहिजे याकडे लक्ष राहू दे.'


हेही वाचा : Sara Ali Khan सोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला 'हा' मिस्ट्री मॅन कोण?


'धूम' हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात ईशा देओल शिवाय जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या मुख्य भूमिका आहे. तर या चित्रपटात ईशानं शीना ही भूमिका साकारली आहे.