मुंबई : अभिनेत्री ईशा देओलने अलीकडेच पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं आहे. तिच्या निर्मितीखाली बनलेला 'एक दुआ' हा लघुपट गेल्या महिन्यात ऑनलाईन रिलीज झाला होता. ईशाने या लघुपटात मुस्लिम महिलेची मुख्य भूमिका साकारली होती. ईशा कदाचित इतके दिवस चित्रपटांमध्ये सक्रिय नसेल पण सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. अलीकडेच, ईशा देओलने खुलासा केला आहे की, तिच्या कंबरेवर एक मोठा टॅटू आहे जो तिने गेले 11 वर्षे लपवून ठेवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्या कंबरेवरील एक मोठा टॅटू दिसत आहे. ईशाने पांढरी जीन्स आणि गुलाबी स्वेटटीशर्ट घातला आहे. तिने स्वेटरला कंबरेवर किंचित वर केलं आहे जिथून तिच्या टॅटूचा एक छोटासा भाग दिसत आहे. हा फोटो शेअर करताना ईशाने लिहिलंय की, 'होय, तुम्ही बरोबर अंदाज लावला. हे खरं आहे मी हा टॅटू 2009मध्ये गोंदवला होता. 



धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देवोलने 2002 मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने 'युवा', 'धूम', 'दस', 'नो एंट्री' सारख्या काही मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये ईशाने तिचा बॉयफ्रेंड भरत तख्तानीशी लग्न केलं. ईशाला राध्या आणि मिराया या 2 मुली आहेत. बऱ्याच काळानंतर ईशा पुन्हा एकदा अभिनय करण्यासाठी सज्ज झाली आहे.