मुंबई : ईशा देओल आणि भरत तख्तानीला २० ऑक्टोबर रोजी कन्यारत्न झाले. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमामालिनी आणि धर्मेंद पुन्हा आजी आजोबा झाले आहेत. यापूर्वी हेमा मालिनीची लहान मुलगी अहानाला एक मुलगा आहे. त्याच्या जोडीला आता चिमुकली बहीण आल्याने घरात आनंद  द्विगुणित झाला आहे. 


ईशाने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर सोमवारी तिला बाळासह रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता ईशा आणि भरतच्या मुलीच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ईशाच्या मुलीचे नाव राध्या ठेवण्यात आले आहे.  राध्याचा अर्थ आराधना करणं,पूजा करणं असा  होतो. 


ईशा आणि भरतने नावाचा विचार आधीच केलाच होता. मात्र ते नाव घरीच जाऊनच सगळ्यांना सांगायचे असे त्यांनी ठरवले होते. काही दिवसांपूर्वी ईशाला मुलगी झाल्यास मला तिला भरत नाट्यम शिकवायला आवडेल असे हेमा मालिनींनी सांगितले होते. 


हेमा मालिनींसोबत ईशा आणि अहानादेखील शास्त्रीय नृत्य करतात. अनेक ठिकाणी त्या लाईव्ह कार्यक्रमदेखिल करतात.