मुंबई : झगमगत्या विश्वातील चांगल्या बाजू असल्यातरी अशा अनेक गोष्टींमुळे सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात येतं. सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर काही कमेन्टचा वर्षाव करतात, तर काही मात्र त्यांना ट्रोल करतात. आता सध्या ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकली आहे अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल. ईशाला तिच्या बोल्ड फोटोमुळे ट्रोल केलं जात आहे. ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये ईशाने काळ्या रंगांची स्पोर्ट्स ब्रा आणि ट्रॅक पँट घातली आहे. फोटोमध्ये ईशा कंबरेवरील टॅटू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज आणि परफेक्ट फिगर पाहून काहींनी कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र ईशाला ट्रोल केलं आहे. एका युझरने कमेन्टमध्ये लिहिलं की, 'तुझं लग्न झालं आहे, आता तरी असे फोटो पोस्ट करू नको...'



मुलीच्या या गोष्टीवर वडिलांकडून कौतुक
काही दिवसांपूर्वी ईशाने स्वतः एक मोनोक्रोम फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मुलीच्या फोटोवर धर्मेंद्र म्हणाले, 'काही घाला किंवा नका घालू पण चेहऱ्यावर हसू कायम असू द्या....'


ईशा बद्दल सांगायचं झालं तर ती बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख बनवू शकली नाही. प्रसिद्ध सेलिब्रिटी नसली तरी तिच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. ईशा 40 वर्षांची आणि दोन मुलांची आई मुलगी आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते..