मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आश्रम 3' या वेब सीरिजनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. पहिल्या दोन पर्वांना या सीरिजनं अक्षरश: वेड लावलं होतं. ज्यानंतर आता तिसऱ्या पर्वाची उत्सुकता असतानाच सीरिज प्रदर्शित झाली आणि यामध्ये ईशा गुप्ताच्या बोल्ड सीन्सनं पाहणारे स्तब्धच झाले. (esha gupta intimate scene 12 hours ashram 3 web series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त इशाच नव्हे, तर काही कलाकारांनी हे इंटिमेट सीनही अतिशय सुरेखरित्या कुठेही किळस वाटणार नाही, अशा प्रकारे प्रेक्षकांच्या समोर आणले. 


अभिनेत्री Shailene Woodley ही त्यापैकीच एक अभिनेता माईल्स टेलक याच्यासोबत प्रणयदृश्य़ चित्रीत करतानाचा आपला अनुभव चांगला असल्याचं तिनं सांगितलं. 



एका सीनदरम्यान, Ryan Reynolds नं अभिनेत्रीच्या अंतर्वस्त्रांची पट्टी उघडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहून Ryan त्याचे डायलॉग्सच विसरला होता. पण, सर्वच कलाकारांचे हे अनुभव चांगलेच असतात असं नाही. 



Lena Dunham हिनं आपण इंटिमेट सीनच्या दरम्यान हतबल झाल्याचं म्हटलं होतं. तर, अभिनेत्री Kate Winslet हिनं आपण जर एखाद्या चादरीमध्ये गुरफटून अशी दृश्य देत असू, तर ते पाहून याविषयी नंतर मात्र वाईट वाटतं, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. 




एक दोन नव्हे, तर तब्बल 12 तास Justin Timberlake यानं एका इंटिमेट सीनचं चित्रीकरण केलं होतं. पण, हा सीनही प्रचंड थकवणारा होता असं त्यानं सांगितलं. एका वळणावर तर आपल्याला या सर्व गोष्टींची चीड येऊ लागते असंही तो म्हणाला. 



अभिनेत्री Angelina Jolie मात्र याला अपवाद आहे. कारण आपण इंटिमेट सीनच्या वेळी कधीच संकोचलेपणाचा सामना न केल्याचं ती सांगते. काही कलाकारांमध्ये असणारं मैत्रीचं नातंही अशा दृश्यांमुळे बिघडतं. Michelle Williams- Ryan Gosling ही त्यातीलच एक जोडी.