अभिनेत्री ईशा गुप्ताचं धक्कादायक स्पष्टीकरण, `या` कारणामुळे लोकांकडून होत होता अपमान
अभिनेत्री ईशा गुप्ताने अतिशय धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
मुंबई : अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतिशय धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्या बालपणात तिला 'काली माँ' म्हणून छेडलं जायचं. कारण होतं तिचा रंग गडद. जेव्हा चित्रपटसृष्टीतही अभिनेत्री ईशा गुप्ताला तिच्या काळ्या रंगामुळे लोकांच्या कमेंट्सला सामोरं जावं लागायचं. ईशा म्हणाली की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिची एक काकू तिला काली माँ म्हणायची याचं कारण म्हणजे ती सावळी होती.
एवढंच नाही तर ईशा असंही म्हणाली की, तिचे बरेच दूरचे नातेवाईक तिच्या आईकडे खंत व्यक्त करत असत की, घरात मुलगी जन्माला आली आणि जर अभिनेत्रीवर विश्वास ठेवायचा झाला तर नातेवाईक देखील तिच्या आईसमोर खंत व्यक्त करायचे की, मुलगी सावळी आहे. ईशा गुप्ताने या मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला चित्रपटसृष्टीतही असाच एक अनुभव आला होता, जिथे तिला स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
ईशा म्हणाली की, तिला असंही सांगण्यात आलं होतं की, इंडस्ट्रीच्या अनेक अभिनेत्रींनी तिचा काळा रंग लपवण्यासाठी स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट करुन घेतली पाहिजे. ईशाच्या म्हणण्यानुसार, केवळ सावळ्या रंगासाठीच नव्हे तर नाकासाठीही, अभिनेत्रीला सल्ला देण्यात आला की तिने तिची शस्त्रक्रिया करून घ्यावी. ईशा म्हणाली की, तिने लोकांच्या बोलण्यानं तिचा आत्मविश्वास खराब होऊ दिला नाही आणि असा कोणताही सल्ला स्वीकारला नाही. ईशा जन्नत 2, राज 3, रुस्तम आणि कमांडो 2 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.