Esha Gupta चा हॉट किलर लूक, फॅन्स म्हणाले फ्लावर नाही तू तर फायर आहे
Esha Gupta ने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
Esha Gupta Bold Photos : बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने भलेही चित्रपटांपासून दुरावले असले तरी ती आपल्या सुपर सिझलिंग लुक्सने चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही.
आपल्या बिकिनी आणि बोल्ड फोटोंने ईशा गुप्ताने पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यासोबत तिने पांढरा थाई हाय स्लिट श्रग कॅरी केला आहे.
केस अंबाड्याच्या रूपात बांधलेले आहेत आणि हातात निळ्या रंगाची क्लच बॅग आहे. ईशा गुप्ताने तिचा लूक हेवी मेकअप आणि रेड कलरच्या लिपस्टिकने पूर्ण केला आहे.
ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ईशा गुप्ताची ही स्टाईल चाहत्यांनाही पसंत पडत आहे. एका चाहत्याने लिहिले, "फुल नाही, तू आग आहेस." अनेक चाहत्यांनी रेड कलरचे हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
अनेकांनी फायर इमोजी पोस्ट केले आहेत. ईशा गुप्ताच्या या लूकचे अनेकांनी 'हॉट' असे वर्णन केले आहे. ईशा गुप्ताच्या या फोटोंवर आतापर्यंत एक लाख ४० हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.
ईशा गुप्ता वेळोवेळी अशा फोटोमुळे चर्चेत असते. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ईशा लवकरच 'देसी मॅजिक' चित्रपटात दिसणार आहे.