मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा आपल्या हॉट लूकमुळे वर्चस्व गाजवणारी ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंमुळे नव्हे तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगाबद्दल खुलासा
'जन्नत 2' चित्रपटातून बॉलिवूडच्या जगात पाऊल ठेवणारी अभिनेत्री ईशा गुप्ता अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ईशा फिगर फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर करत असते. मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब पटकावणाऱ्या ईशाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ईशा गुप्ता मल्लिका शेरावतसोबत थ्रिलर वेब सीरिज नकबमध्ये दिसणार आहे. ईशाने एका मुलाखतीत तिच्या रंगाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.


संपूर्ण शरीरावर केलं जायचं पेंट
ईशा गुप्ताने सांगितलं की, लोकं आणि तिचे सहकलाकार तिला येवून सल्ला देत की, ती गोरी दिसली पाहिजे. ईशाने सांगितलं की गडद रंगामुळे तिचं संपूर्ण शरीर रंगलं होतं. अभिनेत्री म्हणाली की काळा रंग सेक्सी किंवा नकारात्मक म्हणून पाहिला जातो. ईशा म्हणाली, आशा आहे की काळा आणि पांढऱ्या रंगाबाबत लोकांच्या मानसिकतेमध्ये येत्या काळात बदल झाला पाहिजे. कारण मी आई झाल्यावर मी माझ्या मुलीला आणखी काही शिक्षण देईन. काळानुसार सर्व काही बदलेल.


ईशाचे चित्रपट
जन्नत 2, रुस्तम, कमांडो 2 आणि बादशाहो सारख्या हिट सिनेमामध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाणारी ईशा गुप्ता अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी ग्लॅमरस पोझमध्ये फोटो शेअर करते. महेश भट्ट यांनी ईशा गुप्ताला हिंदुस्थानची अँजेलिना जोली ही पदवीही दिली होती.