मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं आणि ही अभिनेत्री लग्ना आधीच प्रेग्नंट असल्याचं आढळून आलं होतं. 12 नोव्हेंबर 2021 रोजी एव्हलिनने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून ती अनेकदा तिच्या मुलीचे फोटो शेअर करते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे जो प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर
एव्हलिन शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर काही लोकं त्याचं कौतुक करत आहेत. तर काही लोकं तिला ट्रोल करत आहेत. एव्हलिन अनेकदा ब्रेस्ट फिडींग करतानाचे फोटो शेअर करते. ज्यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. 



गेल्यावर्षी दिला मुलीला जन्म
एव्हलिन शर्मा आपल्या मुलीसोबतचे फोटो इंस्टावर कायम शेअर करत असते. अभिनेत्रीची ही पहिलीच मुलगी आहे. एव्हलिनने नोव्हेंबर 2021 मध्ये एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने 15 मे 2021 रोजी तुषान भिंडीसोबत लग्न केलं. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिने  एवा रानिया भिंडीला जन्म दिला आहे. यासोबतच तिने आपल्या मुलीला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे. एवा रानिया भिंडीच्या आईचं.


खास आहे मुलीचं नाव
या पोस्टसोबतच एव्हलिन शर्माने खुलासा केला आहे की, तिने तिच्या मुलीचं नाव एवा ठेवलं आहे. एवा हे लॅटिन नाव आहे. ज्याचा अर्थ 'पक्षी', 'जीवन', 'पाणी' आहे. याशिवाय तिचं आणखी एक महत्त्व आहे. सेंट एवा ही राजा पेपिनची मुलगी होती. जो आंधळेपणातून बरा झाला होता. त्यानंतर ती नन बनली. विशेष म्हणजे पेपिन हा रोमन साम्राज्यातील जर्मन भाषिक लोकांचा राजा होता.