मुंबई : सध्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ड्रग्स प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या सह आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान अर्थातचं शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या शाहरुखसाठी ही वाईट वेळ आहे. पण शाहरुखच्या वाईट काळात त्याचे चाहते, मित्र परिवार आणि कुटुंब कायम त्याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक सेलिब्रिटींनी आर्यनचं समर्थन केलं. आता तर शाहरुखचे  चाहते त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या निवासस्थानी 'मन्नत' येथे पोहोचले आहेत. शाहरुख खानच्या घराबाहेरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात शाहरुख खानचे चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर पोस्टर लावल्याचं दिसून येत आहे.



चौकशीत आर्यनने केला मोठा खुलासा
'माझे वडील शाहरुख खान खूप व्यस्त असतात. सध्या ते एकाचवेळी 3 चित्रपटांचं शूटिंग करत आहेत. ते इतके व्यस्त आहेत की, त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला त्यांच्या असिस्टंट पूजाची अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलंय की, त्याने परदेशातून चित्रपट निर्मितीचा कोर्स केला आहे.