ऑनस्क्रीन `मेघनादा`चं झिनत अमान कनेक्शन माहितीये ?
वाचून थक्कच व्हाल....
मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. परिणामी बहुतांश क्षेत्रातील कामकाज ठप्प आहे. अगदी कलाविश्वाचंचही. मालिकांच्या नव्या भागांचं चित्रीकरण थांबल्यामुळे अनेक वाहिन्या आणि विशेष म्हणते दूरदर्शनकडून प्रेक्षकांसाठी जुन्या आणि अतिशय लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. ज्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
सध्या गाजणाऱ्या 'रामायण' या मालिकेत सुरु असणारे भाग पाहता, रावणाच्या मुलाची म्हणजे 'मेघनाद इंद्रजित'ची बरीच चर्चा सुरु आहे. ही भूमिका साकारली होती, अभिनेता विजय अरोरा यांनी. या अभिनेत्याचं झिनत अमान कनेक्शनही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच. अरोरा हे चित्रपट वर्तुळातही गाजलेल्या कलाकारांपैकी एक. त्यांनी १९७२ मध्ये 'जरुरत' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ज्यानंतर ते 'राखी और हथकडी' या चित्रपटातूनही झळकले होते. यामध्ये त्यांनी आशा पारेख यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. पण, तुम्हाला माहितीये का त्यांच्याविषयी चर्चा तेव्हा झाली जेव्हा ते झिनत अमान यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या 'चुरा लिया है ....' या गाण्याचतून झळकले.
झिनत अमान यांच्यासमवेत अरोराही या गाण्यात झळकले होते. झालात ना तुम्हीही थक्क? एफटीआयआय अर्थात Film and Television Institute of India मध्ये त्यांना सुवर्णपदकही मिळालं होतं.
'कादंबरी', 'इन्साफ', 'नाटक', 'एक मुठ्ठी आसमान', 'मेरे भैय्या', 'अनुराग', 'जीवन ज्योती', 'बडे दिल वाला', 'जान तेरे नाम' अशा चित्रपटांतून ते झळकले होते. ज्याशिवाय टेलिव्हिजन विश्वात ते 'रामायण', 'भारत एक खोज', 'लकिरें', 'तलाश' अशा कार्यक्रमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ११० चित्रपटांमध्ये काम केलं.