`सर्व काही लवकरचं ठिक होईल...` कोरोना काळात शिल्पाचा विश्वास
कोरोनामुळे सर्वचं त्रस्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे दिवसाला हजारो रूग्णांना आपल्या जीवाची आहूती द्यावी लागत आहे. सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. अशात ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'सर्व काही लवकरचं ठिक होईल...' असं म्हणत लोकांना सकारात्मक केलंय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या शिल्पाची ही सकारात्मक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
फोटो पोस्ट करत शिल्पाने कॅप्शनमध्ये, 'सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याबद्दल आपण सतत ऐकत आहोत. सर्व काही विनाशकारी आहे. या सगळ्या बातम्यांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपण शुन्याकडे जातो. मध्येच कोणी गरजूंची मदत केल्याची एखादी पोस्ट आपल्या नजरेसमोर येते. कोरोना रूग्णांसाठी जेवण बनवणारे कितीतरी लोक हे एकटे राहतात.'
पुढे शिल्पा म्हणाली, 'अनेक प्रतिनिधी तर गरजू रूग्णांना ऑक्सिजन, बेड्स पुरवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे डॉक्टस महत्त्वाची माहिती लोकांपर्यंक पोहोचवण्यासाठी ऑनलाईन सेशन घेत आहेत. आपण जर कोणासाठी थोडंजरी काही करू शकत असाल तर नक्की करा. थोडा वेळ बाहेर जा आणि मोठा श्वास घ्या. '
'विश्वास ठेवा इथून पुढे सगळं चांगलंच होणार आहे... वर्तमानकाळात जगा... सध्या आपण चांगल्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असा विश्वास ठेवा. 'कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनामुळे सर्वचं त्रस्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. तर शिल्पाने लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.