सुशांतच्या मृत्यूनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या घरी पोहचली
अंकिता सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहचली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनाच हैराण केलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी अंकिता सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहचली. अंकितासोबत आणखी काही जणही सुशांतच्या घरी गेले होते. सुशांतच्या घरी अंकिताची जवळपास अर्धा तास पोलीस चौकशी करण्यात आली.
सुशांतच्या घरी जातानाचा अंकिताचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये, अंकिता लोखंडे अतिशय दु:खी दिसत आहे. अंकितासह तिचा मित्र संदीप सिंहदेखील होता. सुशांतच्या निधनानंतर अंकिताची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र अंकिताच्या मित्रांनी सुशांतच्या मृत्यूनंतर तिची परिस्थिती ठिक नसल्याचं सांगितलं आहे.
अंकिता आणि सुशांतने पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते दोघेही जवळपास 6 वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघे लग्नही करणार असल्याचं बोललं जात होतं. पण 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर, मात्र दोघांचे मार्ग वेगळे झाले. 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. पवित्र रिश्ता मालिकेतून दोघांच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंतीही मिळाली होती.
पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताच्या स्थितीबद्दल सांगितलं. प्रार्थनाने सांगितलं की, अंकिता सतत रडत आहे, ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, अंकिता स्वत:ला सावरु शकत नव्हती. अंकिता सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ इच्छित होती परंतु जाऊ शकली नाही. सुशांतला अशा अवस्थेत कधीही पाहिलं नव्हतं आणि आताही पाहू शकत नसल्याचं अंकिताने सांगितलं.