Rakhi Husband Adil Khan: अभिनेत्री राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) ही बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिचा प्रियकर आदिल दुर्रानी हा बिग बॉसच्या घरात गेला होता आणि त्याने राखीला प्रपोज केला. यानंतर राखी सावंत ही बिग बॉसच्या (big boss) घराबाहेर पडली आणि तिने थेट लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. त्या  दोघांनीही एकमेकांसोबत लग्नाची कबुली दिली. त्यानंतर धक्कादायक बाब समोर येते ती म्हणजे, राखी सावंतने तिचा पती आदिल खान दुर्रानीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. त्याचं एका मुलीसोबत अफेअर असल्याचं म्हटलं होतं. याची चर्चा सुरु असताना आता अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटो समोर आला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा: ...म्हणून राखीचा नवरा आदिल खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! 


तसेच राखी सावंतने मीडियाशी बोलताना दावा केला होता की, ती मराठी बिग बॉसमध्ये असल्यापासून त्या मुलीचे आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) अफेअर होते. जर आदिल सुधारला नाही तर ती त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणेल, त्या मुलीचे नाव आणि फोटो- व्हिडीओही सार्वजनिक करेल असं ती म्हणाली होती. आता ते राखीचं म्हणणं खरं केलं आहे. तिने सगळ्यांसमोर त्या मुलीचं नाव सांगितलं आहे. आता आदिल आणि त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदिलची गर्लफ्रेंड राखीपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. सौंदर्य असो किंवा फिटनेस प्रत्येक गोष्टीत ती राखीला टक्कर देत असल्याची फोटोमध्ये दिसून आलं. 



राखीने आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू असल्याचं उघड केलं असून ती मराठी बिग बॉसमध्ये असताना आदिलचं अफेअर सुरू झाल्याचं बोललं जातंय. पाच आठवड्यांनंतर बाहेर आल्यावर तिला हा प्रकार कळला. तिने आदिलची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही असं राखीने म्हटलं.