'धर्मवीर 2' सिनेमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. या प्रीमियरच्यावेळी सर्वाचं लक्ष वेधलं ते आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुशांत शेलारने. सुशांत शेलारचं वजन अतिशय कमी झालं असून सुशांतला पटकन ओळखणं चाहत्यांसाठी अतिशय कठीण होऊन गेलं. स्वतः सुशांत शेलारने 'झी 24 तास'ला आपल्या तब्बेतीची माहिती दिली आहे. 


वजन घटण्यामागचं कारण काय? 



सुशांत शेलारने वजन कमी होण्यामागचं पहिलं कारण सांगितलं की, 'एका सिनेमासाठी ठरवून वजन कमी केलं. सुशांत शेलारचा 'रानटी' हा आगामी सिनेमा येत आहे. या सिनेमाकरिता सुशांत शेलारने ठरवून वजन कमी केलं आहे. ही संपूर्ण प्रोसेस योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.'


फक्त एवढंच कारण आहे का? 



सुशांत शेलारने पुढे बोलताना सांगितलं की, सिनेमासाठी वजन कमी केलंच. पण नंतर जूनपासून मला तीन ते चार वेळा Food Poisoning झालं. इतक्यांदा हा त्रास झाल्यामुळे डॉक्टरांनी मला काही चाचण्या सांगितल्या. टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं मला ग्लुटनची आणि अनेक पदार्थांची ऍलर्जी होत आहे. यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश. 


कोणते पदार्थ केले वर्ज्य?


सुशांत शेलार पुढे म्हणाला की, ग्लुटन म्हणजे फक्त गहू नाही. तर माझा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव. अनेक महिने मी वडापाव खाल्लेला नाही. बटाटा, पाव, गहू, दूध आणि दुग्धजन्यपदार्थ यासारख्या बऱ्याच पदार्थांची ऍलर्जी असल्याचं लक्षात आलं. यामुळे हे पदार्थ वर्ज्य केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्याला बाजारात मिळारे पदार्थ ही 100 टक्के नैसर्गिक आणि भेसळमुक्त नसतात. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत आहे. या सगळ्यात सुशांत शेलार यांचे 8 ते 10 किलो वजन कमी झालं आहे. 


चाहत्यांचे मानले आभार 


'धर्मवीर 2' सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरनंतर सुशांत शेलारचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एवढंच नव्हे तर 'तब्बेतीची काळजी घ्या?', 'सर तुम्ही बरे आहात ना?' चाहत्यांनी या शब्दात चिंता व्यक्त केली. सुशांत शेलार यांनी झी 24 तासच्या माध्यमातून सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.