मुंबई : निशा रावल आणि करण मेहरा घटस्फोटासाठी कायदेशीर लढा देत आहेत. दोघांनी यापूर्वी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. Nisha Rawal ने करणवर मारहाणीचा आरोपही केला होता. त्याचबरोबर, अलीकडेच निशा रावलच्या Extramarital affair ची बरीच चर्चा झाली होती. अलीकडेच निशाचं नाव रोहित साथियासोबत जोडलं गेलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणने सांगितलं होतं की, निशाचं तिचा भाऊ रोहित साथियासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. करणने सांगितलं की, निशा रोहितला राखी बांधायची पण आता दोघांचं अफेअर सुरु आहे. निशाच्या म्हणण्यानुसार, करणने तिच्यावर खोटे आरोप केले आहेत. आता निशाने तिच्या Extramarital affair अफेअरच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.


निशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल म्हणाली
नुकत्याच झालेल्या press conferece निशाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि सांगितलं की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाच जबाबदार धरत नाही. याशिवाय तिने करणला हे सगळे खेळ खेळणं थांबवण्यास सांगितलं आणि त्याला सभ्य पद्धतीने लढण्यास सांगितलं. निशा म्हणाली, 'मला माझी आणि माझ्या मुलाची भीती वाटते.


उद्या माझ्या मुलाने हा व्हिडिओ पाहिला तर? मी घरातून बाहेर पडलो आणि माझ्या मुलासमोर कोणी असं काही बोललं तर?' याशिवाय निशा म्हणाली,  'मला माझ्या मुलाला चांगल्या वातावरणात वाढवायचं आहे आणि जर करणला तेच हवं असेल तर त्याने मागे हटावं'.


ईमेज खराब करण्यासाठी केलं 
यादरम्यान निशा म्हणाली की, मला अशा लोकांना महत्त्व द्यायचं नाही जे करणला त्याची प्रतिमा डागाळण्यासाठी मदत करत आहेत. करण चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. निशाने असा दावा केला आहे की, ती जे काही करत आहे ते तिच्या मुलासाठी आहे म्हणून तिला सर्वकाही शांततेत हवं आहे. निशा पुढे म्हणाली, 'जर करणला काही हवं असेल तर त्यासाठी कायदा आहे'. याआधी करणने दावा केला होता की निशा आपल्या मुलाचा सहानुभूती मिळविण्यासाठी वापर करत आहे.