Fatwa Against Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या चित्र-विचित्र फॅशनसाठी ओळखले जाते. नेहमी अतरंगी कपडे घालून उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर फिरत असते. तिची ही फॅशन पाहून अनेकदा कपाळावर हात मारण्याची वेळ येत असते. पण याच गोष्टीमुळे सोशल मीडियासह सर्व ठिकाणी आपली चर्चा सुरु असल्याने उर्फी जावेद रोद नवनव्या फॅशन घेऊन येत असते. मात्र आता तिच्या याच अश्लील कपड्यांवरुन संताप जाहीर करत फतवा जारी करण्यात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी (Faizan Ansari) याने हा फतवा काढला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, जेव्हा उर्फीचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा दिली जाणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फैजान अन्सारीने उर्फी जावेदसंबंधी (Urfi Javed) दफनभूमीत अर्ज दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं आहे की "उर्फी जावेदच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा कधी मुस्लीन तरुणी नग्न फिरते तेव्हा लाज वाटते. उर्फीने इस्लामचा अपमान केला आहे. जेव्हा तिचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा देणार नाही".


मुस्लिमांची बदनामी


"उर्फी जावेद ज्या प्रकारचे कपडे घालते त्याच्यामुळे जगभरातील मुस्लिमांची बदनामी होत आहे. जर आपण इस्लामला मानत नाही असं तिचं म्हणणं असेल तर तिने नाव बदलावं. पण उर्फीने धर्माच्या दृष्टीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत," असं फैजान अन्सारीने म्हटलं आहे.


उर्फी स्वत:ला मुस्लीम मानत नाही


उर्फीने एका मुलाखतीत आपण इस्लामला मानत नाही असं सांगितल्याचं फैजान अन्सारीने सांगितलं. दरम्यान उर्फी जावेदविरोधात फतवा जारी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही उर्फी जावेदच्या कपड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मुंबई पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केली होती. तसंच तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर उर्फीने आपली सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं होतं. 


उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध सुरु झालं होतं. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं.