Famous Actor Brother Shops Vegetables: निळ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स परिधान केलेला कोणत्याही सर्व सामान्य मध्यम वर्गीय व्यक्तीप्रमाणे दिसणारा तो रस्त्याच्याकडेला उभ्या राहणाऱ्या भाजीवाल्याकडून भाजी घेत असतानाच अनेक फोटोग्राफर्सनी त्याला घेरलं. एकीकडे हे फोटोग्राफर्स त्याची झलक टीपण्यासाठी धडपडत असताना तो मात्र भाजीविक्रेत्याला लवकर लवकर भाज्या द्या मला घरी जाऊन जेवणही बनवायचं आहे असं सांगताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसत आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय तिचा सख्ख्या भावाला जवळपास संपूर्ण भारत ओळखतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे रस्त्यावरील हातगाडीवर भाजी घेणाऱ्या या व्यक्तीच्या भावाची एकूण संपत्ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या व्यक्तीचा सख्खा भाऊ 1862 कोटी रुपयांचा मालक आहे. 


मीच घरातील सगळं काम करतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीचा व्हिडीओ काढताना कोणीतरी पहिल्यांदा आम्ही अशाप्रकारे एखाद्या सेलिब्रिटीला भाज्या विकत घेताना पाहतोय असं म्हटलं. ते ऐकल्यानंतर या व्यक्तीने, 'माझी सारी कामं मी स्वत: करतो,' असं सांगितलं. "मी स्वत: माझी सारी कामं करतो. मी स्वत: माझी कार चालवतो. माझ्या सर्व गोष्टींची काळजी, देखरेख मी स्वत: घेतो. माझं आयुष्य मी स्वत: संभाळतोय," असं या व्यक्तीने फोटोग्राफर्सला सांगितलं. 


ही व्यक्ती आहे तरी कोण?


आता ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती आहे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा सख्खा भाऊ, फैसल खान! वयाच्या तिसऱ्या वर्षी काका नासिर हुसैन यांच्या 1969 च्या 'प्यार का मौसम' या चित्रपटामध्ये छोट्या शशी कपूर यांची भूमिका साकरत फैसलने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर 1988 साली फैसलने 'कयामत से कयामत तक'मध्ये त्याने खऱ्या अर्थाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यात त्याने गुंडाचा छोटाशी भूमिका साकारली होती. त्यानंतर फैसलने त्याच्या वडिलांच्या 'तुम मेरे हो' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. हा चित्रपट 1990 साली प्रदर्शित झालेला. त्यानंतर त्याने 1994 च्या 'मदहोश' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर आपटला.


तुम्हीच पाहा या व्यक्तीचा व्हिडीओ...



पाच वर्षांचा ब्रेक


अपयशानंतर फैसलने पाच वर्ष ब्रेक घेतला. त्यानंतर 2000 साली 'मेला' या चित्रपटामधून भावाबरोबर मोठ्या स्क्रीनवर पुनरागमन केलेल्या फैसलचा हा चित्रपटही आपटला. या चित्रपटामधील फैसलच्या कामाचं चाहत्यांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलं पण चित्रपट फारसा चालला नाही.त्यानंतर फैसलने 2017 साली 'डेंजर' नावाच्या चित्रपटामध्ये काम केलं. पण हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्याने 2021 साली दिग्दर्शक म्हणून 'फॅक्टरी' चित्रपट केला. या मध्ये त्याने गाणंही गायलं आहे. त्यानंतर त्याने 2022 साली 'ओपांडा' नावाचा कन्नड चित्रपट केला.