मुंबई : दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याचं पाकिस्तानने कबूल केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. दरम्यान त्याच्या नव्या प्रेयसीचं नाव देखील समोर आलं आहे. दाऊदची नवी प्रेयसी पाकिस्तानी अभिनेत्री असल्याचं समोर येत आहे.  महविश हयात असं नाव असलेल्या दाऊदच्या पाकिस्तानी प्रेयसीला गँगस्टर गुडिया या नावाने देखील ओळखण्यात येतं. ही पहिली अभिनेत्री नाही जिचं नाव दाऊदसेबत सोबत जोडण्यात आलं आहे. तर बॉलिवूड अभिनेत्रींसोबत देखील त्याचं कनेक्शन राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविश हयात आणि दाऊद इब्राहिम
अभिनेत्री महाविश ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत काम करते. ती दाऊदपेक्षा २७ वर्षांनी लहान आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर दाऊदचा प्रभाव अधिक होता. 


मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम
90च्या दशकात मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानं अभिनेत्री मंदाकिनी हिला रातोरात प्रसिद्धीझोतात आणलं.  


अनीता अयूब आणि दाऊद इब्राहिम
महाविश हयातच्या प्रेमात पडण्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री अनीता अयूबसोबत देखील दाउदचं नाव जोडलं गेलं होतं.  त्यांचं प्रेमप्रकरण अत्यंत गुपित होतं. मात्र निर्माता जावेद सिद्दिकी यांच्या हत्येनंतर दाऊद आणि अनीता यांचं प्रेमप्रकरण जगासमोर आलं. जावेदने अनीताला चित्रपटात काम देण्यास नकार दिल्यामुळे ही हत्या झाली असावी अशा चर्चा रंगत होत्या.


मोनिका बेदी आणि अबू सलेम
अबू सालेम हा त्याच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत आला होता. अभिनेत्री मोनिका बेदी आणि अबू सालेम यांच्या प्रेमप्रकरणाच्या जोरदार चर्चाही रंगल्या होत्या.


ममता कुलकर्णी आणि छोटा राजन
ममताचे सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chota Rajan) सोबत संबंध असल्याच्या बातम्या पुढे आल्या. पण काही वेळेनंतर तिचं नाव ड्रग्स तस्कर विजय गोस्वानामी सोबत जोडलं गेलं. दोघांनी लग्न केल्याचं देखील बोललं गेलं.