प्रसिद्ध कॉमेडियनला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
धमक्यांमागे नक्की काय आहे कारण?
मुंबई : आपल्या विनोदांनी सर्वांना पोट धरून हासवणाऱ्या कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजू यांना पाकिस्तानातून जीवे मागण्याची धमकी मिळत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबाला देखील धोका असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सध्या राजू यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये राजू म्हणत आहेत, 'मला पाकिस्तानातून धमक्यांचे फोन येत आहेत. कॉल करणाऱ्या व्यक्तींनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या कुटुंबाला देखील धमकी दिली आहे. पण मी त्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. मी हिंदू राष्ट्रात जन्म घेतला आहे. हिंदूत्वावर मला कायम गर्व राहील. मी आता पुन्हा सांगत आहे, जो रामाचा नाही तो कोणत्याचं कामाचा नाही.'
व्हॅट्सअपवरून राजू यांना एक कॉल आला. राम मंदिर आणि हिंदूत्वावर आपलं मत मांडल्यानंतर त्यांनी पाकिस्तानातून जीवे मारण्याचा फोन आला. ते म्हणाले, त्यांचा फोन मी उचलल्यानंतर त्यांनी वाईट भाषेचा वापर करत मला धमकी दिली. त्यानंतर मी तात्काल फोन कट केला. राजू यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.