Jeremy Ruehleman Death: मनोरंजन विश्व हे जितकं विस्तारलेलं आहे तितकंच ते गूढही आहे. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमी रूहेलमनचे वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. या बातमीनं फॅशनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूबाबत त्याचा मित्र क्रिस्टीन सिरियानो (Cristin Sirino) यानं इन्टाग्रामवरून बातमी दिली आहे आणि त्याचसोबत आपलं दु:खही व्यक्त केले आहे. त्याच्या मृत्यूबाबत अद्यापही कसलीच स्पष्टता नाही परंतु त्याच्या अचानक झालेल्या या मृत्यूनं संपुर्ण फॅशनविश्वाला आणि मनोरंजन सृष्टीला धक्का बसला आहे. 24 जानेवारीला त्याचे निधन झाले. (Famous Fashion Model jeremy ruehleman dies at the age of 27)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या मित्रानं पोस्ट करताना असं लिहिलं आहे की, इतक्या सुंदर मनाचा मित्र गमावणं हे खरंच खूप धक्कादायक आहे त्याच्या मृत्यूनं निर्माण झालेली पोकळी ही कधीच भरून निघणार नाही. त्यानं आत्तापर्यंत सगळ्यांना प्रेम आणि आपुलकी दिली आहे. त्याच्या प्रेमळ आणि सात्विक स्वभावानं त्यानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी कधी माझ्या एवढ्या जवळच्या मित्राच्या मृत्यूची बातमी इन्टाग्रामवर (Cristin Sirino Instagram Post) पोस्ट करेन आणि पोस्ट करणारा तो मी पहिला असेन. त्यानं मला कायमच प्रभावित केले आहे. त्याचबरोबर त्यानं माझ्यावर खूप प्रेम केले. माझ्यासाठी तो एक प्रेरणास्थान होता. 


आपल्या पोस्टमध्ये पुढे क्रिस्टननं म्हटलं आहे की, मी त्या सगळ्यांनाच प्रेम देऊ इच्छितो, त्याच्या मित्रपरिवाराला आणि त्याच्या कुटुंबियांना, त्यांनी त्यांच्या खूप जवळची व्यक्ती गमावली आहे. मला माहितीये की आम्ही परत कधी ना कधीतरी भेटूच परंतु आत्ता मला त्याला एक गोड मिठी मारायची आहे. जेरेमी आम्ही सगळेच तुझ्यावर प्रेम करतो. खूप प्रेम करतो आणि हे प्रेम कायमच तुझ्यावर राहील, असं सांगत त्यांनं ही भावनिक पोस्ट इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे.


जेरेमी रूहेलमननं पेरी एलिस (Modeling) आणि सुपरड्रीासाठी मॉडेलिंग केले होते. त्याचसोबतच आपल्या मृत्यूच्या काहीच दिवस आधी त्यानं 20 जानेवारीला एक फोटोशूट शेअर केले होते. त्याच्या या फोटोला प्रचंड लाईक्सही आले होते. सध्या त्याच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. एवढ्या तरूण वयात आणि उमलत्या करिअरमध्ये त्याचा मृत्यू होणं हे सगळ्यांसाठीच फार धक्कादायक होते. 



त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे परंतु अद्यापही त्याचा मृत्यू कशानं झाला याबद्दल अद्यापही कसलीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.