मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना दाखवत असते. पण सध्या अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर लोकं तिची खिल्ली उडवत आहेत. मात्र, हा व्हिडिओ चेष्टेने शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज आणि शिल्पाची जोडीला चांगलीच पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पाचा व्हिडिओ
'इंडियाज गॉट टॅलेंट'चा 9वा सीझन  15 जानेवारीपासून ऑन एअर होणार आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान शिल्पा आणि मनोज खूप मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी सेटवरून दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. खरंतर, व्हिडिओमध्ये मनोज मुनताशीर त्याची सह जज शिल्पा शेट्टीला टोमणे मारताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मनोजने केली मस्करी
सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी बदाम खाताना दिसत आहे. यावर मनोज तिची थट्टा करतो आणि म्हणतो, 'शिल्पा जी, ही बुद्धी आहे ना... बदाम खाऊन येत नाही... धोके खाऊन येते'. यावर विचार करून शिल्पा म्हणते, 'बरं, तू बदाम धोके खात नाहीस. म्हणून…. शिल्पाचं हे उत्तर ऐकून मनोजचा चेहरा पडतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.