Prajakta Mali Lesbian Partner: प्राजक्ता माळीची `लेस्बियन पार्टनर` बनायला `ही` अभिनेत्री तयार, स्वतः केलं उघड...
Prajakta Mali Lesbian Partner: नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण या सगळ्यात हे फार कमी लोकांना माहीत आहे की, एका नावाजलेल्या अभिनेत्रीने प्राजक्ता माळीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता (Prajakta Mali Viral Video) चाहत्यांच्या संपर्कात राहते. असंख्य मुलांची ती क्रश आहे. त्याचबरोबर अनेक मुलींनाही ती आवडते. पण या सगळ्यात हे फार कमी लोकांना माहीत आहे की, एका नावाजलेल्या अभिनेत्रीची ती 'लेडी क्रश' आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कोण आहे ही अभिनेत्री? तर ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे (Rituja Bagwe).
प्राजक्ता ऋतुजाची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोरच तिने मान्य केली आहे. ऋतुजाला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, असंही ऋतुजाने प्राजक्ता आणि अख्या जगासमोर उघड केलं आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे, हे तुम्हाला प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये पाहायला मिळेल.
दरम्यान, प्राजक्ता माळीचा नुकताच अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ती श्री श्री श्री रवीशंकर यांना 'खरंच लग्न करणं गरजेचं आहे का?' हा प्रश्न विचारताना दिसली. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
नेहमीच प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकदा तिला तिचे चाहते ती लग्न कधी करणार असा प्रश्नही विचारत असतात. अनेकदा प्राजक्ताच्या रिलेशनशिपबाबत अफवाही उडाल्याच्या बातम्याही आपण पाहल्या आहेत. प्राजक्ताच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ता तिच्या पर्सनल लाईफसोबतच तिच्या प्रोफेशन लाईफमुळेही बरीच चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता तिनं शेअर केलेल्या एका मेसेजमुळे चर्चेत आली आहे.