मुंबई : कलाविश्वात आपल्या आवाजाच्या बळावर स्थान मिळवणाऱ्या, पार्श्वगायनाच्या क्षेत्रात वेळी छाप सोडणाऱ्या आणि ९० च्या दशकात सलमान खानसाठी पार्श्वगायन करणाऱ्या गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. ज्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुब्रमण्यम यांच्यावर उपचार सुरु असणाऱ्या एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयानं त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. शिवाय त्यांच्या शरीराती ऑक्सिजनचं प्रमाणही योग्य असल्याचं सांगत धोका नसल्याचं सांगितलं आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर High Dependency Unit अर्थाच एचडीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 


कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून आल्यानंतर खुद्द सुब्रमण्यमच चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात दाखल झाले होते. ज्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांनी त्यांना गृह विलगीकरणाचाही पर्याय दिला. पण, त्यांनी रुग्णालयातच उपटार घेण्याचा निर्णय घेतला. आपल्याला रुग्णालयातून लगेचच रजा मिळेल असा त्यांचा समज होता, पण आठवडा उलटूनही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही. 



 


सुब्रमण्यम यांनीच सोशल मीडियावर रुग्णालयातून आपला एक व्हिडिओ पोस्ट करत आपण उपचार घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. शिवाय फोनला उत्तर देता येऊ शकत नसल्यामुळं आता आपल्याला कोणीही फोनवरुन संपर्क साधू नये अशी विनंतीही त्यांनी केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.