नवी दिल्ली : टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीने बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चरणसिंग सपरा यांसारख्या अन्य नेत्यांनी पंजाबींचे पक्षात स्वागत केले. 'बिग बॉस-7' (2013) या रिऍलिटी शोमध्ये आपल्या भूमिकेने चर्चेत आलेली पंजाबी दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात काम करत आहे. पण आता काम्याने मार्ग बदलला आहे. तिने राजकारणात येऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे काम्या येत्या काळात जनतेसाठी काय करणार? हे पाहाणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस कार्यकर्ता नीरज भाटिया आणि इतर नेत्यांनी सोशल मीडियावर पक्षात प्रवेश करतानाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या काम्याचे नव्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काम्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या फक्त आणि फक्त तिच्या नावाची चर्चा आहे. काम्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाची इच्छा व्यक्त केली आहे.  



काम्याने आपल्या अभिनयाने अनेकांचं मनोरंजन केलं. तर आता काम्याने जनतेची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.  42 वर्षीय काम्याने 'बनून में तेरी दुल्हन', 'मर्यादा: लेकीन कब तक', 'शक्ती-अस्तित्व के एहसास की', 'रेठी', 'अस्तित्व... एक प्रेम कथा', पिया का घर' आणि 'क्यों'. होता है प्यार' अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे.


याशिवाय काम्याने 'ना तुम जानो ना हम', 'यादे', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'कोई मिल गया' सारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. यासोबतच तिने 'मेहंदी मेहंदी' म्युझिक व्हिडिओ आणि 'पाजामा पार्टी' या नाटकातही काम केले आहे.