प्रसिद्ध गायिकेला पॉर्न व्हिडिओचं व्यसन, या गोष्टींचा डोक्यावर परिणाम
एखाद्या व्यक्तीसाठी पॉर्न पाहणं किती धोकादायक असू शकतं.
मुंबई : एखाद्या व्यक्तीसाठी पॉर्न पाहणं किती धोकादायक असू शकतं. या बद्दल एका गायिकेने आपल्या मुलाखतीत खुलेपणानं सांगितलं आहे. जास्त वेळ पॉर्न पाहिल्याने एखाद्याचं मन कसं बिघडतं हे तिने स्वतः अनुभवलं आहे असं तिने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. एवढंच नव्हेतर पॉर्नमुळे आयुष्य 'उद्ध्वस्त' झाल्याचंही ती म्हणाली.
अश्लील व्यसन
जर तुम्हाला हॉलीवूडच्या जगाची माहिती असेल तर तुम्हाला माहित असेल की, असे अनेक स्टार्स आहेत जे जगासमोर त्यांच्या वाईट व्यसनाबद्दल खुलेपणाने बोलतात आणि नुकतंच प्रसिद्ध गायिका बिली आयलीशने आपल्या व्यसनाबद्दल खुलेपणाने खुलासा केला आहे की, या गोष्टीनं तिला 'उद्ध्वस्त' केलं आहे. पण बिली इलिशची ही दर्दभरी कहाणी जाणून घेण्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की तो कोण आहे?
कोण आहे बिली इलिश
18 डिसेंबर 2001 रोजी लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेली, बिली इलिश ही अभिनेत्री-गीतकार मॅगी बेयर्ड आणि अभिनेता पॅट्रिक ओ'कॉनेल यांची मुलगी आहे. तिच्या आईने बिलीला संगीत आणि गाणी लिहायला शिकवलं. वयाच्या चौथ्या वर्षी, बिलीने पहिलं गाणं लिहिलं आणि वयाच्या 8 व्या वर्षी तिने संगीत प्रतिभा शोमध्ये भाग घेणं सुरू केलं. 2019 मध्ये, ग्रॅमी पुरस्कारांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की, एका तरुण गायिकेला 6 श्रेणींमध्ये नामांकन मिळाली आणि पाच पुरस्कार जिंकले, त्यापैकी 4 पुरस्कारांच्या मुख्य श्रेणी होत्या.
मुलाखतीत केला खुलासा
बिली इलिशने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिने लहानपणापासूनच पॉर्न पाहण्यास सुरुवात केली होती. पॉर्न पाहिल्यामुळे तिचं मन बिघडल्याचं तिला वाटतं आणि तिला रात्री भयानक स्वप्ने पडू लागली. तिने सांगितलं की, जेव्हा मी हे माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती खूप ओरडली होती. सिंगरने सांगितलं की, पॉर्नमुळे तुमची सेक्सबद्दलची समज कमी होते. जवळच्या क्षणांमध्ये सामान्य काय आहे हे तुम्हाला समजत नाही.