मुंबई : ऋतिक रोशननंतर बॉलिवूडमध्ये फ्लेक्सिबल अभिनेता म्हणून 'टायगर श्रॉफ' च्या शरीरयष्टीची चर्चा होते. टायगरचे अ‍ॅक्शन स्टंटदेखील कमाल असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगरच्या स्टंटबाजीचा असाच चाहता त्याला इंप्रेस करण्यासाठी चूक करून बसला आहे. 


काय केलं चाहत्यानं ? 


टायगर श्रॉफच्या चाहत्यानं चक्क १३ फूटवरून उडी मारण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 
अमन टायगेरियन या ट्विटर हॅन्डलवरून या चाहत्यानं टायगर श्रॉफसाठी व्हिडिओ ट्विट केला. या खाली कॅप्शनमध्ये लिहताना तो म्हणाला,  ' मी माझ्या हाईटवरून उडी मारण्याच्या भीतीवर मात केली आहे. खालून मस्त वाटत असेल पण उंचावरून सारंच भयावह असते. पण मी माझ्या मनाची तयारी केली आहे. मला मी सुपरहिरो असल्याचा विश्वास दिला. मला प्रेरणा दिल्यानंतर धन्यवाद! ' 



 



काय म्हणाला टायगर श्रॉफ ?  



 
टायगर श्रॉफ हा व्हिडिओ पाहून नाराज झाला. असा प्रकार पुन्हा न करण्याचा सल्ला टायगरने दिला अअहे. ट्विटला रिप्लाय करताना टायगर म्हणाला, ' माफ करा ! हा मूर्खपणा आहे. आयुष्याला अशाप्रकारे रिस्कमध्ये टाकू नका. अ‍ॅक्शन हिरो अशाप्रकारे स्टंट करताना सुरक्षेची काळजी घेतात. त्यांना पुरेसे ट्रेनिंग़ आणि मदतनीस असतात. तुम्ही स्वतःच्या जीवावर उदार होऊन असं करू नका. 

चाहत्याची माफी 


टायगर श्रॉफच्या या  चाहत्यानेही  आपल्या चुकीची कबुली दिली. त्यानंतर असा प्रकार न करण्याच  सांगितलं आहे. 



टायगर श्रॉफ लवकरच 'बागी २' चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये टायगर सोबत दिशा पटणी आहे. तसेच लवकरच 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे.