Video : ए तो बघ कार्तिssssक आर्यन ; बाजूच्या कारमध्ये अभिनेता दिसताच तरुणांनी मारली हाक
पाहता पाहता कार्तिकच्या चाहत्यांचा आकडाही वाढत होता. तरुणींमध्ये तर, त्याचं भलतंच वेड.
मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा अभनेता कार्तिक आर्यन फार कमी वेळातच लोकप्रिय झाला. पाहता पाहता कार्तिकच्या चाहत्यांचा आकडाही वाढत होता. तरुणींमध्ये तर, त्याचं भलतंच वेड.
काही दिवसांपूर्वीचीच घटना, कार्तिकच्या घराखाली जात काही तरुणींनी त्याच्या नावानं हाका मारण्यास सुरुवात केली. (fans shouted as they spotted bollywood Actor kartik aryan next to them on road video viral )
आपल्याप्रती असणारं चाहत्यांचं हे वेड पाहता कार्तिकनंही इमारतीखाली येत भर रस्त्यात या चाहत्यांची भेट घेतली. हे क्षण अविश्वसनीय असल्याच्या भावनेने एका चाहतीला रडूच आलं.
अशीच आणखी एक घटना पुन्हा एकदा कार्तिकसोबत घडली. जेव्हा काही तरुण मंडळी रात्री मुंबईत फेरफटका मारण्यासाठी निघालेले असताना त्यांना कॅबमधून जात असताना आपल्या शेजारच्या कारमध्ये चक्क कार्तिक आर्यन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
कार्तिक यावेळी त्याच्या मिनी कूपर या कारमधून जात होता. शेजारच्या कारमध्ये कार्तिक असल्याचं कळताच या तरुणांनी त्याला जोरजोरात हाकही मारली. त्यावेळीच कार्तिकचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यानंही त्यांना हातानं इशारा केला.
कार्तिकनं आपल्याकडे पाहिल्याचं लक्षात येताच या तरुणांनाही भलताच आनंदही झाला.
मोबाईलमध्ये त्यांच्यातील एकानं हे क्षण कैद केले आणि तेच क्षण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कार्तिक आणि या तरुणांची कॅबही वेगात असल्यामुळे दृश्य काहीशी धुसर असली तरीही या व्हिडीओतील भावना मात्र फारच स्पष्टपणे समोर येत आहेत हे मात्र खरं.