मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांनी आपल्या 80 आणि 90 च्या दशकात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ज्यांनी आपल्या शैली आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जयाप्रदा यांनी जवळपास सात भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. पण काही काळानंतर त्या चित्रपट जगतापासून दुरावल्या आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जया यांनी नुकताच त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा केला. मात्र या वयातही जया यांची मोहिनी कमी झालेली नाही. आजही त्या खूप सुंदर दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच जया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये जया यांनी गाऊन परिधान केला असून त्या अप्सरासारख्या सुंदर दिसत आहेत. जया यांचे हे फोटो पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, खरंच या तुम्ही आहात का? तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहात, तर दुसर्‍या एका चाहत्याने कमेंट केली आहे की,  तू अप्सरेसारखी दिसतेस. जया सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.



जयाप्रदा यांनी सरगम, मां, घर घर की कहानी, तूफान, स्वर्ग से सुंदर, संजोग, मुद्दत, सिंदूर, जबरदस्त, जख्मी, गंगा तेरे देश में, कामचोर, आवाज, पाताल भैरवी, सपनों का मंदिर, यासह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जया यांनी जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


जयाप्रदा त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी हिट ठरली. जयाप्रदा यांनीही श्रीदेवीसोबत सुमारे डझनभर चित्रपटांमध्ये काम केलं. श्रीदेवी त्या वेळी जयाप्रदा यांच्या प्रतिस्पर्धी असल्या तरी. अनेक वर्षे त्यांच्यात संवाद नव्हता.