फराह खाननं खरंच चप्पल घालून लावली पूजेला हजेरी? ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर...
Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात्र, फराहनं उत्तर दिलं आहे.
Farah Khan : गणेश चतुर्थी 2023 च्या निमित्तानं बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक फोटो समोर आले आहेत. अनुष्या शर्मा ते अर्पिता खान आणि शिल्पा शेट्टी सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगामन झाले आहे. त्यासोबत अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांनी देखील गणपतीची पूजा केली. यावेळी फराह खान आणि हुमा कुरेशी हे देखील त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यांवेळी त्यांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी फराह खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर एका फोटोमध्ये फराहनं चप्पल परिधान केली आहे. त्यामुळे चप्पल घालून मंदिरात कोण जात असं म्हणत नेटकऱ्यांनी फराहला ट्रोल केलं आहे.
फराह खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती हुमा कुरेशी आणि पत्रलेखासोबत दिसत आहे. पत्रलेखानं साडी नेसली आहे, तर फराह आणि हुमानं ड्रेस परिधान केला आहे. फराहनं कॅप्शनमध्ये लिहिलं की खान, कुरेशी आणि राव/ पॉल कडून गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. राजकुमार राव तू खूप व्यग्र होतास की आम्ही तुझ्याशिवाय आम्ही फोटो काढला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फराहनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं चप्पल घातली आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, कृपया तुम्ही ही चप्पल काढा. असं गणपती बाप्पाचं दर्शन घेत नाहीत. गणपती बाप्पा समोर तर असं जाऊ नका. दुसरा नेटकरी म्हणाला, पूजाच्या वेळी असं कोण करतं. त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना फराहनं उत्तर दिलं आहे. एका नेटकऱ्याला उत्तर देत फराह म्हणाली, आम्ही घराच्या बाहेर होतो. पण धन्यवाद हे सांगण्यासाठी. पण तुमचं लक्ष हे चप्पलकडे गेलं म्हणजे तुमचे विचारच चांगले नाहीत.
हेही वाचा : अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक
फराह विषयी बोलायचं झालं तर तिनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील चलया हे गाणं डायरेक्ट केलं आहे. हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं आहे.