मुंबईः अभिनेता फरदिन खान हा एकेकाळी अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत होता. गेले काही वर्ष तो इंडस्ट्रीपासून दूर होता. मात्र ईदच्या पार्टीत फरदिन खान पुन्हा दिसला. यावेळी त्याच्यातील आश्चर्यकारक बदल दिसून आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनेत्री हुमा कुरेशीच्या ईद पार्टीत फरदिन खान उपस्थित होता. यावेळी पार्टीला जातानाचे त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. 



फरदिन खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. काही दिवसांपूर्वी अचानक वाढलेल्या वजनाचा त्याचा फोटो समोर आला होता. तेव्हा फरदिन खान आजारी असल्याचं अनेकांना वाटत होतं. तर काहींना त्याला ओळखणंही कठीण झालं होतं.



यानंतर फरदिन खानने स्वत:च्या फिटनेसवर असं काम केलं की, तो पुन्हा जुन्या लूकमध्ये परतला. जेव्हा जुन्या लूकसह तो परत आला तेव्हा पुन्हा या चॉकलेट हिरोची आठवण त्याच्या चाहत्यांना झाली. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.



फरदीन खान कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याविषयी आतापर्यंत अनेक कयास बांधले जात होते, मात्र आता हे स्पष्ट झाले आहे. 'नो एन्ट्री 2' या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूरसोबत फरदीनची एन्ट्री होणार आहे. ईदच्या पार्टीत दिसलेला हा जुना लूक वेगाने व्हायरल होत आहे. फरदीनला जुन्या डॅशिंग लूकमध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदातही भर पडली आहे. आता फक्त फरदीन खानला ऑनस्क्रीन पाहण्याची प्रतीक्षा आहे.