श्रद्धा कपूरसोबत अफेअरच्या चर्चांवर फरहानचा पहिल्यांदाच खुलासा
अधुना भबानीला घटस्फोट दिल्यानंतर अशी चर्चा होती की, अभिनेता फरहान अख्तर हा अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करतोय. ‘रॉक ऑन २’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.
मुंबई : अधुना भबानीला घटस्फोट दिल्यानंतर अशी चर्चा होती की, अभिनेता फरहान अख्तर हा अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करतोय. ‘रॉक ऑन २’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.
या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यावर फरहान किंवा श्रद्धा यांनी बोलणं टाळलं होतं. आता फरहान हा पहिल्यांदाच या अफवांवर बोलला आहे. फरहान म्हणाला की, ‘आम्ही दोघांनीही नेहमीच हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की, आम्ही केवळ चांगले मित्रच आहोत’.
नुकत्याच एका वृत्तपत्राशी बोलताना फरहान याला सिंगल असण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, ‘सध्या मी कोणत्याही रिलेशनशीपबाबत गंभीरतेने विचार करत नाहीये. जे व्हायचे, तेच होईलच’.
फरहान पुढे म्हणाला की, ‘दुर्दैवाने तुमच्या एखाद्या मित्रावर प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा तुमची मैत्री प्रभावित होत असते. हे ठिक नाहीये. हे सगळं केवळ अफवांवर आधारित असतं’.
दरम्यान, फरहान आणि अधुना यांचं २००० साली लग्न झालं होतं आणि २४ एप्रिलला त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याचं नाव श्रद्धा कपूरसोबत जोडलं गेलं. दोघे लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहतात, असंही बोललं गेलं. इतकंच काय तर श्रद्धाचे वडील अभिनेते शक्ती कपूरही याने रागावले होते, अशी चर्चा झाली होती.