मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये फरहान आणि शिहानीच्या प्रेमाला उधाण आल्याचं दिसत आहे. अनेक फोटो असे आहेत ज्यामध्ये फरहान आणि शिवानी एकमेकांच्या प्रेमात मग्न झाल्याचं दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सर्वत्र त्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. त्यांच्या लग्नानंतरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघे परफेक्ट कपल दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधान आलं आहे. फोटो पाहून शिबानी प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न युजर्स कमेंट करत विचारत आहेत. याआधी शिबानी लग्नात घातलेल्या लाल ड्रेसमुळे देखील चर्चेत आली. 


सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शिबानीचे बेबी बम्प दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. शिबानी आणि फरहान बद्दल सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत होते. आता त्यांनी लग्न केलं आहे.