Madaar Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या 'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट 2023 या महोत्सवात (2023 Cannes Film Festival) मराठी चित्रपट बाजार विभागातून मंगेश बदर (Mangesh Badar) दिग्दर्शित 'मदार' या चित्रपटाची निवड झाली आहे. याआधी, पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागातून एकूण सात चित्रपटांची निवड करण्यात आली होती, त्यात 'मदार' ची देखील निवड होऊन अनेक पुरस्कारावर मदारने मोहर उमटवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक पातळीवरील 'कान्स' महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या समितीने सुमारे 34 चित्रपटांपैकी सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित 'टेरीटेरी', मंगेश बदर दिग्दर्शित 'मदार' आणि संदीप सावंत दिग्दर्शित 'या गोष्टीला नाव नाही' या 3 चित्रपटांची निवड करून ते 'कान्स' महोत्सवात पाठविले आहेत. तशा प्रकारची अधिकृत निवड राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जाहीर केली.


पाहा Video



दरम्यान, 2018 पासून या चित्रपटाला सुरूवात झाली होती. बजेटला खूप पैसे लागतात, शेतकऱ्याच्या मुलाने एवढे पैसे आणायचे कुठून? मात्र, मैत्रपरिवारांनी आणि बाकी सर्वांनी मदत केली, त्यामुळे हा चित्रपट यशस्वी होतोय. दृष्काळग्रस्त भागातील जे वास्तव आहे, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. ती परिस्थिती आम्ही जगत आलो आहोत, असं दिग्दर्शक मंगेश बदर म्हणतात.


लहानपणापासून मला चित्रपटाचं वेड होतं. परिवाराचा माझ्या कामाला प्रथम विरोधच होता. मात्र, त्यानी मला सपोर्ट देखील केला. प्रोड्यूसर मिळणं खूप अवघड आहे. खूप हिंमतीने आम्ही चित्रपट सुरू केला. त्यानंतर देखील पैशाची अडचण जाणवू लागली. त्यानंतर मित्रांनी मदत केली. आता हा चित्रपट  'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेलाय. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर आता आम्हाला दुसरा चित्रपट देखील करता येईल, असं म्हणत मंगेश बदर यांनी यशोगाथा सांगितली.