Review | शेवटपर्यंत लक्ष हटू न देणारा फास्टर फेणे
सिनेमात एकही गाणं नाही, किंवा प्रेमप्रकरण नाही, भडकपणा नाही तरीही सिनेमा सतत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : डिटेक्टीव ब्योमकेश बक्शी फक्त गुन्हेगारांचा माग काढत होते, मात्र फास्टर फेणे हा जीव धोक्यात टाकून गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो, आणि यानंतर काय होतं?, सिनेमात एक साहसपूर्ण धमाल आहे, आणि ही धमाल, आणि उत्सुकता संपूर्ण सिनेमाभर तुम्हाला लक्ष केंद्रीत करायला लावते.
भा रा भागवत यांच्या फुरसुंगाची फास्टर फेणे या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असला, तरी नव्या पिढीच्या आणखी फास्टर फेणे किती जवळ आणता येईल, याचा संपूर्ण प्रयत्न या सिनेमात झाला आहे, आणि तो पूर्णपणे यशस्वी झाल्याचंही म्हणता येईल.
यात तंत्रज्ञानाची मदत आरोपी शोधण्यासाठी किंवा धोका टाळण्यासाठी कशी होते, हे दाखवण्यात आलं आहे. पुण्यातील लोकांना पुण्यातला सिनेमा नेहमीच पाहायला आवडतो, तसा हा सिनेमा आहे.
फास्टर फेणेत मराठीची तगडी स्टार कास्टने सिनेमाच्या स्टोरीवर आपला प्रभाव दाखवला आहे. दिलीप प्रभावळर, उमेश कुलकर्णी आणि अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवने अप्रतिम भूमिका साकारली आहे.
उमेश कुलकर्णीने साकारलेला आप्पा हा पाहण्यासारखा आहे, सिनेमात थरकाप उडवून, रंग भरणारा आप्पा त्याने साकारला आहे, उमेश कुलकर्णीने आप्पा कसा साकारलाय, हे शब्दात न सांगता येणारं आहे, ते पडद्यावर तुम्ही स्वत: पाहा.
सिनेमात एकही गाणं नाही, किंवा प्रेमप्रकरण नाही, भडकपणा नाही तरीही सिनेमा सतत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, मराठीत आणखी एक दर्जेदार सिनेमाची भर फास्टर फेणेच्या निमित्ताने पडली आहे.
फास्टर फेणे म्हणजेच फा फे मधला बनेश फेणे- बन्या फेणे काय करामती करतो, त्याचं लॉजिक काय असतं, आणि कोणतीही बाब ओळखण्यासाठी तो किती फास्ट आहे.
या सिनेमातून तुम्हाला पाहता येणार आहे, नक्की पाहावा असा हा सिनेमा आहे. आदित्य सरपोतदार यांचं दिग्दर्शन चांगलं झालंय, कथा रंगवण्यात ते यशस्वी झाले आहेत.