मुंबई : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटाला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ चित्रपटच नाही तर गाणीही सर्वांनाच पसंत पडत आहेत. सोशल मीडियावर प्रत्येत जण चित्रपटातील गाण्यांवर शॉर्ट व्हिडीओ तयार करत आहेत. अशात एका वडील आणि मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघे 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' (Srivalli) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वडील आणि मुलीची जोडी पोर्तुगालच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे. दोघेही अनेकदा बाथरूमच्या आरशासमोर उभे राहून व्हिडीओ तयार करतात. 'पुष्पा' दाक्षिणात्य चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाणं जगभरात सर्वांनाच पसंत केले जात आहे. 


पोर्तुगालचं नाही तर अनेक देशांतही 'श्रीवल्ली' गाण्याची क्रेझ दिसून येत आहे.  इंस्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हायरल व्हिडीओ 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.