मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या नात्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. रिलेशनशिपपासून ते अगदी लग्नापर्यंत या दोघांनीही सर्वांच्या नजरा वळवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा शमत नाहीत, तोच इथे अभिनेता आमिर खान आणि त्याच्या कथित प्रेयसीच्या नात्यानं भलत्याच चर्चांना वाव दिला आहे. 


आमिरची ही कथित प्रेयसी म्हणे विकी कौशलच्याही संपर्कात आहे. 


आता ही नेमकी भानगड काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?


तर, अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्यासोबत गेल्या काही काळापासून आमिरचं नाव जोडलं जात आहे. आमिर आणि फातिमा डेट करत असल्याचं जणू जोरदार वादळच उठलं आहे. 


आता म्हणजे विकीशी तिचं नाव जोडलं जात आहे. पण, निमित्त ठरतंय ते म्हणजे एक महत्त्वाचं कारण. 


विकी येत्या काळात मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटातून झळकणार आहे. त्यातच आता फातिमाचीही वर्णी लागली आहे. 


फक्त फातिमाच नव्हे, तर आणखी एक दंगल गर्ल सान्या मल्होत्रा हिच्या वाट्यालाही हा चित्रपट आला आहे. 


सान्या या चित्रपटामध्ये सिल्लू मानेकशा साकारणार आहे. तर, फातिमा वर एका मोठ्या भूमिकेची जबाबदारी आहे. 



देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे. 


सान्याच्या वाट्याला आलेली ही भूमिका जितक्या ताकदीची आहे, तितकीच ती आव्हानात्मकही आहे. ज्यामुळे आता ती ही भूमिका किती 'परफेक्ट' साकारते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.