नवी दिल्ली : पाकिस्तानात पोलियो लसीकरणला विरोध करणं ही नवीन बाब नाही परंतु याला विरोध करण्यात अभिनेता फवाद खानचं नाव आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान विरोधात मुलीला पोलियोची लस देण्यास नकार दिल्याने गुरूवारी एफआयआर दाखल करण्यात आली होती. पोलियो अभियान टीमने याबाबत लिखित स्वरूपात तक्रार केल्यानंतर लाहौर पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली. आता फवाद खानने याप्रकरणी त्याच्यावर लावण्यात आलेल्या या आरोपांचं खंडण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाकिस्तानात अभिनेता फवाद खानसह इतर सहा लोकांविरोधात आपल्या मुलांना पोलियो लस देण्यास नकार दिल्याने एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, फवादच्या मॅनेजरने त्याने मुलीला पोलियो लस देण्यास नकार दिला नसल्याचं सांगितलं आहे. 'एफआयआर सेंट्रल काउन्सिल मॉनिटरिंग ऑफिसर'च्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पोलियो लसीकरण टीम फवादच्या घरी पोहचली. परंतु फवादच्या कुटुंबियांनी पोलियोची लस देण्यास मनाई केली आणि याचे गंभीर परिणाम होतील असं सांगत धमकीही दिली असल्याचं पोलियो लसीकरण टीमकडून सांगण्यात आलं.



एफआयआर दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये गंभीर आजाराचे संक्रमण पसरवणे, धमकी देणे, लोकसेवेच्या सार्वजनिक कर्तव्यात अडथळे आणणे आणि सरकारी आदेशाची अवहेलना करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. पोलियो देण्यासाठी टीम जेव्हा फवादच्या घरी आली तेव्हा फवाद आणि त्याची पत्नी घरी नसल्याचे त्याने सांगितलं. त्याने मी पूर्णपणे पोलियो अभियानाला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. फवादने दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून असं न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्याने सांगितलं. 


बॉलिवूडमध्ये 'खुबसूरत' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला खास प्रतिसाद मिळाला नव्हता. हा चित्रपट यूके, यूएई आणि पाकिस्तानमध्येही प्रदर्शित करण्यात आला होते. फवादने तिथे मालिकेत काम केल्यामुळे त्याचे मोठे चाहते आहेत. पाकिस्तानी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये फवाद खानला सुपरस्टारचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय फवाद अनेक मोठ्या आंतराष्ट्रीय आणि पाकिस्तानी ब्रॅन्डचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडरही आहे.