महिला खासदाराचा पतीसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल, कॅमेरासमोर Kiss करत...
वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेते.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेते.
तिने केवळ आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली नाहीत तर तिच्या सौंदर्यांवर अनेकजण फिदा आहेत. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.
नुसरतने जगभरातील लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा मोठा चाहतावर्ग देखील आहे.
त्याच वेळी, अभिनेत्री तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दरम्यान, नुसरतने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी नुसरतने यश दासगुप्ता यांना खूप रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. अनेक फोटोंचा हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.या फोटोंमध्ये नुसरत आणि यश एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसत आहेत.
पोस्ट शेअर करताना ती कॅप्शनमध्ये लिहिते, 'मला घाईत नाही, मी तुम्हाला हळूहळू समजून घेत आहे, यासाठी मी थोडा वेळ घेत आहे.
आपला आत्मा एक आहे, तुझा आणि माझा...'आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल लोक सतत पाहत आहेत आणि पसंत करत आहेत. चाहत्यांसोबतच सर्व नेटकरी व्हिडिओवर कमेंट करून नुसरतचे कौतुक करत आहेत.