Fighter Twitter Review : हृतिक आणि दीपिकाचा पहिला चित्रपट पाहायचा की नाही; पब्लिक रिव्ह्यू एकदा वाचाच
Fighter Twitter Review : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट पाहण्याआधी नक्कीच वाचा रिव्ह्यू... तरण आदर्श यांच्यापासून नेटकऱ्यांपर्यंत अशी आहे सगळ्यांची प्रतिक्रिया
Fighter Twitter Review : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा फायटर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांना हा चित्रपट कसा वाटला हे सांगितलं आहे. याशिवाय क्रिटिक्स म्हणजेच चित्रपट समिक्षकांनी देखील या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. आता चला तर जाणून घेऊया प्रेक्षकांना कसा वाटला हा चित्रपट...
चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी फायटरचा रिव्ह्यू शेअर केला आहे. तरण यांनी चित्रपटाला अप्रतिम म्हटलं आहे. त्याशिवाय चित्रपटाला किंगसाइज मनोरंजन चित्रपटात आहे, असं देखील त्यांनी म्हटलं. त्यासोबत फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण यांच्यासोबत इतर सपोर्टिंग भूमिका आहेच त्यांची स्तुती केली आहे.
काय म्हणाले तरण आदर्श?
एका शब्दात जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर फायटर हा अप्रतिम आहे. तर या चित्रपटाला त्यांनी साडेचार स्टार दिले आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची ही हॅट्रीक आहे. कारण आधी वॉर, पठाण आणि आता फायटर. ड्रामा, इमोशन आणि देशावर असलेलं प्रेम सगळं काही यात पाहायला मिळतंय. नक्कीच पाहा.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...
एक नेटकरी म्हणाला, 'फायटर संपूर्ण पाहिला. अप्रतिम आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायलाच हवा. नेहमी प्रमाणे हृतिक रोशननं लेव्हल वाढवत काम केलं आहे. दीपिकानं ही त्याचप्रमाणे अप्रतिम काम केलंय. इतरांनी देखील त्यांच्या अभिनयानं सगळ्यांवर छाप सोडली आहे. मित्रांनो, नक्कीच जा आणि चित्रपटाचा आनंद घ्या.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फायटर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहतोय, हृतिक आणि सिद्धार्थनं नेहमी प्रमाणेच दर्जेदार काम केलं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'काय अप्रतिम चित्रपट आहे. सिद्धार्थ आनंदनं पुन्हा एकदा चांगलं काम केलं आहे. फक्त चित्रपटाचं प्रमोशन इतकं झालं नाही म्हणून त्याविषयी जास्त चर्चा होत नाही आहे. पण नक्कीच चित्रपट हा अप्रतिम आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'फायटर चित्रपटानं मनं जिंकलं! हृतिक-दीपिकाचा पावर पॅक्ट पर्फॉर्मन्स होता. त्यासोबत त्यातील डायलॉग्स हे आणखी भारी आहेत. या चित्रपटातं सगळं काही आहे. 5-star entertainment!'