नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याच्या कृत्याचा बुरखा तर न्यायालयानेच फाडला. आता हा बाबा तुरूंगात आहे. पण, त्याचे कारनामे चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावर येणार आहेत. बाबाच्या भूमिकेत कोण दिसणार याबबत उत्सुकता आहे. मात्र, हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार अशी जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा राम रहीम तुरूंगात २० वर्षांची सजा भोगत आहे आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. पोलीस तिच्या मागावर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हनीप्रीत नेपाळच्या इटहरीमधील परिसरात दिसली होती. दरम्यान, सांगितले जात आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून राम रहीमचे गुन्हेगारी विश्व आणि त्याचे कारनामे पुढे आणले जाणार आहे. यात बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख ते रॉकस्टार आणि पुढे तुरूंगवास असा प्रवास दाखवला जाणार आहे. तसेच, हनीप्रीतचे त्याच्यासोबत असलेले नातेसंबंधही या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणले जातील.


प्राप्त माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे या चित्रपटाचे शुटींगही सुरू झाले असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात एजाज खान तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, आशुतोष मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. दरम्यान, बाबा राम रहीमची भूमिका कोण करत आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.