नवी दिल्ली : पद्मावत चित्रपटावरून वाद, विरोध, हंगामे चालू असताना चित्रपटाचा नवीन टीझर समोर आला आहे. आतापर्यंत चित्रपटात शाहिद कपूरचे राजपूत डायलॉग ऐकले होते. मात्र यात तुम्हाला रणवीर सिंगचा आवाज आणि अंदाज पाहायला मिळेल. रणवीरच्या अलाउद्दीन खिलजीच्या खतरनाक लूकबद्दल चर्चा होत होती. आता यात रणवीर सिंगचे आव्हान स्विकारताना शाहिद कपूर दिसेल.


 नवा टीझर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लीला भन्सालींचा हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या टीझरमध्ये तुम्हाला 'कह दीलिए अपने सुल्‍तान से, उनकी तलवार से ज्‍यादा लोहा हम सूर्यवंशी मेवाड़ियों के सीने में है.' असे दमदार संवाद ऐकायला मिळतील. तुम्हीही पहा हा नवा टीझर...



भन्साळींबरोबरचा हा शाहिदचा पहिला चित्रपट


अनेक वादविवादांना सामोरे जात हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे. यात दीपिका पदूकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत असून भन्साळींबरोबरचा हा शाहिदचा पहिलाच चित्रपट आहे.